Friday, August 6, 2021
No menu items!
Homeक्राईमनामलगाव फाट्याजवळ तरुणाचा मृतदेह आढळला घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल

नामलगाव फाट्याजवळ तरुणाचा मृतदेह आढळला घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल


बीड (रिपोर्टर):- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील एसआर जीनिंगसमोर एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला.
रवि अंशीराम येवले (वय ३०, रा. गोंदी, ह.मु. घोसापुरी शिवार) हा तरुण सकाळी नामलगाव फाट्याजवळील एसआर जीनिंगसमोरील कचर्‍याच्या ढिगारात पडलेला आळून आला. त्याच्या शरीरावर संपुर्ण आईल लागलेले होते. त्याचा खून की अन्य काही याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी पीआय संतोष साबळे, पीएसआय रोटे यांच्यासह पोलीसांनी धाव घेतली होती.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!