Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeकोरोनान्युमोनियाचा रिपोर्ट एकाचा, उपचार दुसर्‍यावर जिल्हा रुग्णालयाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर

न्युमोनियाचा रिपोर्ट एकाचा, उपचार दुसर्‍यावर जिल्हा रुग्णालयाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर


बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या संसर्गवाढीने त्रस्त झालेल्या जिल्हावासियांना जिल्हा रुग्णालयाचा आधार आहे. परंतु रुग्णालयातच अनागोंदी कारभार होत असल्याचे उघड झाले असून न्युमोनियाचा १७ स्कोअर असलेल्या वृद्धाचा रिपोर्ट अन्य बाधीत रुग्णाच्या फाईलला जोडला गेल्याने त्याच्यावर दोन दिवस न्युमोनियाचा उपचार केला गेल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्हा रुग्णालयात घडला. ७० वर्षीय रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल आहे तर दुसरा रुग्ण हा क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात एक ७० वर्षीय रुग्ण दाखल आहे. त्याची तपासणी केल्यानंतर त्या रुग्णाला न्युमोनिया झाल्याचे उघड झाले. न्युमोनियाचा स्कोअरही १७ असल्याने सदरील रुग्ण हा गंभीर असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. परंतु हा रिपोर्ट त्या ७० वर्षीय रुग्णाच्या फाईलला न लावता तो रिपोर्ट आयटीआयमध्ये क्वॉरंटाईन असलेल्या अन्य एका तरुण बाधिताच्या फाईलला लावण्यात आला. त्या व्यक्तीला तुमचा स्कोअर १७ आल्याचे सांगत क्वॉरंटाईन सेंटरमधील डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचारही सुरू केले. न्युमोनियाला आटोक्यात आणण्यासाठी जे औषधोपचार केले जातात ते औषधोपचार आणि इंजेक्शनही त्याला देण्यात आले. त्या क्वॉरंटाईन व्यक्तीला न्युमोनिया नसून केवळ कोरोनाचे लक्षणे असल्यामुळे त्याला आयटीआयमध्ये क्वॉरंटाईन ठेण्यात आले होते मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले की, आयटीआयमध्ये क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तीला जो रिपोर्ट देण्यात आलेला आहे तो जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या ७० वर्षीय रुग्णाचा आहे. तेव्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तीचा उपचार बंद केला अणि या ७० वर्षीय रुग्णावर उपचार सुरू केले. कोरोनासारख्या महामारीत एवढ्या बेजबाबदारपणे जिल्हा रुग्णालय आणि तेथील अधिकारी, कर्मचारी या पद्धतीने काम करत असल्याने रुग्णालयातला सावळा गोंधळ समोर आला.

Most Popular

error: Content is protected !!