Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडफ्युज टाकण्यासाठी गेलेल्या तरुणाचा जळून कोळसा

फ्युज टाकण्यासाठी गेलेल्या तरुणाचा जळून कोळसा


बीड (रिपोर्टर)- लॉकडा-ऊनच्या सुट्टीमध्ये सालगडी असलेल्या आपल्या वडिलांकडे राहण्यासाठी आलेला तरुण शेतातील वीज गेल्यामुळे ट्रान्सफार्मरमधील फ्युज टाकण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन शॉक लागून आग लागल्याने जळून खाक झाल्याची दुदैर्वी घटना आज सकाळी आहेर वडगाव शिवारातील खजाना विहिरीजवळ मनसबदार यांच्या शेतात घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे सदरील दाम्पत्यांना हा मुलगा एकुलता एक होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळाकडे धावलेल्या गणेशच्या आई-वडिलांनी समोरचे चित्र पाहून अक्षरश: हंबर्डा फोडला.

Untitled 1 copy 1


बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथे सुनिल सुतार हे सालगडी म्हणून एका शेतकर्‍याच्या शेतामध्ये काम करतात. त्यांचा २० वर्षीय मुलगा गणेश हा शिक्षणासाठी बाहेर असतो मात्र कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्याने गेल्या काही दिवसांपुर्वी तो आपल्या पित्याकडे राहायला आला होता. आज तो शेतात असताना जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीकडे गेला तेव्हा विज नसल्याचे लक्षात आले. त्याने जवळच असलेल्या ट्रान्सफार्मरकडे जावून फ्युज टाकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी शॉर्टसर्किट झाले. गणेशलाही यामध्ये शॉक लागला. शॉक एवढा तीव्रतेचा होता की ट्रान्सफार्मरसह आजुबाजुला आग लागली आणि त्या आगीत २० वर्षीय गणेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची घटना आज सकाळी दहा वाजता घडली. ट्रान्सफार्मरजवळ आग लागल्याचे दिसून आल्यानंतर सुनिल तावरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तेव्हा सर्व काही संपलेलं दिसून आलं.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!