Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeक्राईमसरपंच पुत्राचा पेट्रोल पंपावर धुडगूस शिवाजीनगर पोलीस कर्मचार्‍यांनाही केली शिवीगाळ

सरपंच पुत्राचा पेट्रोल पंपावर धुडगूस शिवाजीनगर पोलीस कर्मचार्‍यांनाही केली शिवीगाळ


बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर)- डिझेल भरल्यानंतर कर्मचार्‍याने स्कॉॅर्पिओ मालकास पैसे मागितले असता ‘पैसे देत नाही’, असे म्हणत सरपंच पुत्राने तेथील कर्मचार्‍यासह मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केली. घटनेची माहिती पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी कर्मचार्‍यास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. याबाबत सरपंच पुत्राने शिवीजीनगर ठाण्याच्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या प्रकरणी दोघा जणांविरोधात बीड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संदीपान दत्तोबा बडगे (रा. बेलखंडी पाटोदा) व अभिषेक असाराम पवळ (रा. संभाजीनगर, बीड) हे दोघे काल चर्‍हाटा फाट्यावर असलेल्या उबाळे यांच्या पेट्रोल पंपावर स्कॉर्पिओ (क्र. एम.एच. २३ ए.एक्स. ५९३९) यामध्ये आले होते. डिझेल भरल्यानंतर तेथी कर्मचारी आकाश शिंदे यांनी पैसे मागितले. पैसे का मागितले म्हणून आकाश शिंदे यास मारहाण केली. त्यामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेले मॅनेजर अमोल कदम यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेची माहिती शिवीजीनगर ठाण्याच्या पोलिसांना झाल्यानंतर ठाण्याचे जालिंदर नाना बनसोडे व अन्य कर्मचारी त्याठिकाणी गेले. तेथे गेल्यानंतर शिंदे व कदम यांना ठाण्यात आणले. त्यानंतर संदीपान बडगे आणि अभिषेक पवळ हे दोघे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आले, त्यांनी बनसोडे यांचे गचुरे धरत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ठाण्यातच बडगे यांनी बनसोडे यांना शिव्या दिल्या. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी बनसोडे यांच्या फिर्यादीवरून संदीपान बडगे व अभिषेक पवळ या दोघांविरोधात कलम ३५३, ३३२, ५३४, ५०६, ३४ अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३ (१ आर), ३ (१ एस) ३ (२व्ही.ए.) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. संदीपान बडगे यांची आई बेलखंडी पाटोद्याची सरपंच आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!