Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडगांधीनगरचा परिसर न.प.हद्दीत येत नाही का?

गांधीनगरचा परिसर न.प.हद्दीत येत नाही का?

नालीचे पाणी लोकांच्या घरात; नागरीक स्वत:च नाल्या काढू लागले
बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिका नेहमीच विकासाचे मोठमोठे दावे करत असते. मात्र शहरातील गांधीनगर परिसरात रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्या असतात. या समस्यांकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करते. महिनो महिने नाल्या उपसल्या जात नसल्याने नाल्याचे दुर्गंधीयुक्त पाणी लोकांच्या घरात घुसू लागले आहे. न.प. कर्मचारी नाल्या काढत नसल्याने नागरिकांना स्वत: आपल्या घरासमोरील नाल्या काढाव्या लागतात. गांधीनगरचा परिसर न.प. हद्दीत येत नाही का? अशा संतप्त प्रतिक्रिया भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
बीड नगरपालिकेच्या अंतर्गत रस्ते, नाल्या आणि पिण्याच्या पाण्याच्या सस्यांबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी असतात. नगरपालिका मात्र शहरात मोठमोठे बॅनर लावून विकासाशी कटिबद्ध असल्याचे सांगत असते. प्रत्यक्षात मात्र विकास झालाय कुठं? असा प्रश्‍न समोर येत आहे. शहरातील गांधीनगर परिसरात वेळेवर नाल्या काढल्या जात नाहीत. त्यामुळे नाल्यांचे पाणी लोकांच्या घरात घुसू लागले. अनेक वेळा मागणी करूनही नाल्या काढण्याबाबत नगरपालिका प्रशासन उदासिनता दाखवत आहे. त्यामुळे नागरिक स्वत:च आपल्या घरासमोरची नाली काढत असल्याचे चित्र गांधीनगर भागात पहायला मिळत आहे. हा परिसर नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही का? या भागाचा विकास का केला जात नाही? यासह अन्य प्रश्‍न उपस्थित केले जात असून न.प.च्या विरोधात संतापही व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!