Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जिल्हा रुग्णालयात शंभर बेड वाढविले

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जिल्हा रुग्णालयात शंभर बेड वाढविले


बीड (रिपोर्टर):- गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाहून आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत असल्याचे पाहून लोखंडी सावरगाव येथून शंभर खाटा काल मागविण्यात आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातही दररोज दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता कोविड सेंटर हाऊसफुल्ल होऊ लागले आहेत. रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने काल लोखंडी सावरगाव येथून शंभर खाटा मागवून घेतल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!