Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeदेश विदेश६ मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये तर डिझेल मागे...

६ मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये तर डिझेल मागे ३२ रुपयांचा महसूल कमावला मोदी सरकारची कबुली

नवी दिल्ली (वृत्तसेवा):- सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग १६ व्या दिवशी वधारलेलेच दिसून आले. असं असतानाच दुसरीकडे इंधनविक्रीमधून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात महसूल कमवत असल्याचा खुलासा खुद्द केंद्रानेच केला आहे. अबकारी कर, उपकर आणि अधिभार या माध्यमातून इंधनविक्रीमधून केंद्राची घसघशीत कामाई होत असल्याची कबुली सरकारने दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ६ मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये तर प्रति लिटर डिझेल मागे ३२ रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत आहेत. ही कमाईची आकडेवारी अबकारी कर, उपकर आणि अधिभार या तिन्ही गोष्टी मिळून आहे. २०२० साली मार्च आणि मे महिन्यादरम्यानच्या दरांशी तुलना केल्यास या कालावधीमध्ये केंद्र सरकारला प्रति लिटर पेट्रोलमागे २३ रुपये तर डिझेलमागे १९ रुपये महसूल म्हणून मिळायचे.
आकडेवारीचा अभ्यास केल्यास असं दिसून येतं की, १ जानेवारी २०२० ते १३ मार्च २०२० दरम्यान केंद्र सरकार प्रति लिटर पेट्रोल मागे २० रुपये तर प्रति लिटर डिझेल मागे १६ रुपये महसूल कमावायचे. म्हणजेच १ जानेवारी २०२० च्या आकडेवारीशी तुलना केल्यास सध्या सरकारने प्रति लिटर पेट्रोल मागील कमाई १३ रुपयांनी तर प्रति लिटर डिझेल मागील कमाई १६ रुपयांनी वाढलीय.

Most Popular

error: Content is protected !!