Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाहॉटेल चालकांना दिलासा! 50% क्षमतेने चालू ठेवण्याचे आदेश

हॉटेल चालकांना दिलासा! 50% क्षमतेने चालू ठेवण्याचे आदेश

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग केल्यास दंड बसणार

बीड रिपोर्टर

बीड जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे हॉटेल,बार, रेस्टॉरंट, खानावळी, चहाचे गाडे यावर लावलेली बंदी जिल्हा प्रशासनाने शिथील केली आहे. आता हे सर्व व्यवसाय 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी हे आदेश दिले.बीड जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्यानंतर हॉटेल, बार, खानावळी, चहाचे गाडे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते. या बंदी आदेशाविरोधात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत होते. व्यापारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून त्यांना निवेदने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी बंदी आदेशात सुधारणा केल्या असून आता निम्म्या क्षमतेने हॉटेल, खानावळी, बार, चहाचे गाडे सुरू ठेवता येणार आहेत. मात्र या ठिकाणी मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जावू नये असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.


मॉलही राहणार सुरू

नवीन आदेशानुसार आता शॉपिंग मॉल देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबून सुरू ठेवता येणार आहेत. मात्र त्या ठिकाणी गर्दी होवू नये याची जबाबदारी मालकांना घ्यावी लागणार आहे.


होमआसोलेशनही देणार

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण हे लक्षणे नसणारे आहेत. त्यामुळे त्यांना होमआसोलेशन द्यावे अशी मागणी होत होती. राज्य सरकारनेही तसा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. या पार्श्‍वभूमीवर आता होमआसोलेशन द्यायला जिल्हाधिकार्‍यांनी मंजूरी दिली आहे

Most Popular

error: Content is protected !!