Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडजावयाची सासरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या

जावयाची सासरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या

नेकनूर (रिपोर्टर):- जावयाने सासरवाडीतील एका शेतात जावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही घटना दहिफळ वडमाऊली शिवारात घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गणेश विठ्ठल तांदळे (वय ३५, रा. अंबिलवडगाव) या तरुणाची सासरवाडी दहिफळ वडमाऊली आहे. सदरील तरुणाने सासरवाडीत जावून तेथील तुकाराम मुंडे यांच्या शेतातील चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती नेकनूर पोलीसांना झाल्यानंतर पोलिस कर्मचारी दीपक खांडेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या तरुणांनी आत्महत्या का केली? हे मात्र समोर आले नव्हते. सदरील हा तरुण भाजपाचा कार्यकर्ता होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आला होता. पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!