बीड (रिपोर्टर) माजी ट्रक तुला विकत देतो असे म्हणून एकाने 6 लाख 40 हजार रुपये घेतले मात्र ट्रकही दिली नाही आणि पैसे ही परत केले नाही त्यामुळे परळी ग्रामीण पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत पंढरीनाथ केंद्रे रा.अंबाजोागाई यांनी श्रीकृष्णा दत्तात्रय धन्वे रा.मोरेवाडी ता.अंबाजेागाई यांची ट्रक विकत घेण्यासाठी चार चौकात सौदा केला होता. त्यासाठी धन्वे यांना सहा लाख 40 हजार रुपये दिले होते. मात्र धन्वे यांनी केंद्रे यांना ट्रक दिली नाही व पैसे ही परत ही केले नाही. त्यामुळे केंद्रे यांनी धन्वे यांच्या विरोधात अंबाजोगाई पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मपोना.थोरात या करत आहे.