पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशाने बीड जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती
बाबुराव पोटभरे, वाल्मिक अण्णा कराड, अभयकुमार ठक्कर, सचिन मुळूक, अनिल जगताप, दादासाहेब मुंडे, वैजनाथ सोळंके, राजेंद्र लोमटे, विठ्ठल सानप आदी नावांचा समावेश
राष्ट्रवादी काँग्रेससह , शिवसेना आणि काँग्रेस सदस्यांना दिली समान संधी
मुंबई (दि. १७) ऑनलाईन रिपोर्टर : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हा नियोजन समितीवर दोन विधिमंडळ सदस्य, जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले दोन सदस्य असे नामनिर्देशित सदस्य व जिल्ह्यातील ११ निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सर्व समाज घटक व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विचार करत ना. मुंडेंनी सोशल सह पॉलिटिकल इंजिनिअरिंगचा यशस्वी प्रयोग केल्याचे दिसून येते. यात राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिका-यांनाही समान न्याय दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने सदर सदस्यांच्या नियुक्तीचा आदेश पारित केला आहे.
जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्य म्हणून आ. प्रकाशदादा सोळंके व आ. बाळासाहेब आजबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजनाच्या संदर्भातील अनुभवी व्यक्ती म्हणून परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड व सेनेचे अभयकुमार ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष निमंत्रित ११ सदस्यांच्या यादीत बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मादळमोही ता. गेवराई येथील शेख समशेर शेख शब्बीर, चौसाळा ता. बीड येथील सयाजी शिंदे, अंमळनेर ता. पाटोदा येथील विठ्ठल सानप, अंबाजोगाई येथील राजेंद्र लोमटे व सुनील वाघाळकर, बीड येथील महादेव धांडे, काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, अनिल जगताप, परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजनाथ सोळंके या अकरा जणांचा समावेश आहे.
दरम्यान नामनिर्देशित व निमंत्रित या सर्व नवनियुक्त सदस्यांचे धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.