Sunday, April 18, 2021
No menu items!
Home राजकारण ना.मुंडेंकडून ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला न्याय नियोजन समितीवर विठ्ठल सानपांची नियुक्ती

ना.मुंडेंकडून ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला न्याय नियोजन समितीवर विठ्ठल सानपांची नियुक्ती


पाटोदा (रिपोर्टर):- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व समाजासह घटक व महाविकास आघाडीतील पक्षांंचा विचार करत सोशलसह पॉलीटिकल इंजिनिअरींगचा यशस्वी प्रयोग जिल्हा नियोजन समितीत करून अनेकांना न्याय दिला असून यात पाटोदा तालुक्यातील ना.मुंडेंचे खंदे समर्थक विठ्ठल सानप यांना काम करण्याची संधी देवून सच्चा कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना तालुक्यातून व्यक्त केली जात आहे.


पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील विठ्ठल सानप हे गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी एकनिष्ठ राहत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहिले आहेत. ना.मुंडेंसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा जनमाणसात पोहचण्याचे काम सानप हे सातत्याने करत आले आहेत. कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता ते काम करत असल्याने त्यांच्या या एकनिष्ठतेला ना.मुंडेंनी न्याय दिला. सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसाचे काम करणार्‍या ग्रामीण भागातील विठ्ठल सानप यांना नियोजन समितीच्या सदस्यपदावर घेवून ना.मुंडे हे तळागळातील सच्चा कार्यकर्त्यांकडे लक्ष देतात आणि त्यांना काम करण्याची संधी देतात हे यातून स्पष्ट होत असून विठ्ठल सानप यांच्या निवडीने तालुक्यात आनंद साजरा केला जात आहे.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...