Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईशब्बास रे पठ्ठे! म्हणत ना.मुंडेंनी हा मुलगा ऑलंम्पिकमध्ये नाव काढणार अविनाश साबळेंबद्दल...

शब्बास रे पठ्ठे! म्हणत ना.मुंडेंनी हा मुलगा ऑलंम्पिकमध्ये नाव काढणार अविनाश साबळेंबद्दल केले आश्‍वासक ट्विट


बीड (रिपोर्टर):-पटीयाला फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेन्टीक्स स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेने 3 हजार मिटर स्टिपल चेस शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी शब्बास रे पठ्ठ्या म्हणत कौतूकाची थाप मारून हा मुलगा ऑलंम्पिकमध्ये नाव काढणार असा विश्‍वास व्यक्त केला. तर ऑलंम्पिकच्या त्यांच्या चेसिंगमध्ये त्याला काहीही कमी पडू देणार नाही असे आश्‍वासक ट्विटही धनंजय मुंडेंनी केले.


पटीयाला फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 3 हजार मिटर स्टिपल चेस शर्यतीमध्ये 8 मिनिट 20.20 सेकंदात अंतर कापून बीडच्या अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. त्याच्या या कामगिरीनंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज ट्विट करून शब्बास रे पठ्ठ्या म्हणत त्याच्या पाठीवर कौतूकाची थाप मारली. त्याचबरोबर हा मुलगा ऑलंम्पिकमध्ये नाव काढणार हे नक्की असा विश्‍वासही संपादन केला. त्यानंतर ना.मुंडेंनी आणखी एक ट्विट केलं असून त्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात, बीड जिल्ह्याचे नाव जगभर गाजवणारा अविनाश आमचा अभिमान आहे, राज्य सरकारने अविनाशसह अन्य चार खेळाडूंना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत पुर्वतयारीसाठी जानेवारीमध्ये दिलेली आहे, याउपर ऑलंम्पिकच्या त्यांच्या चेसिंगमध्ये राज्य सरकार त्याला काहीही कमी पडू देणार नाही असे आश्‍वासन ना.मुंडेंनी दिले आहे. 

Most Popular

error: Content is protected !!