बीड (रिपोर्टर):- ही निवडणूक एका बँकेची असली तरी निवडणूक आहे, गाफील राहू नका, मतदारांपर्यंत प्रत्यक्ष जा, कोरोनामुळे जास्त गर्दी कुठे होणार नाही याची दक्षता घ्या, तोंडा मास्क वापरा आणि या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान कसे पडेल याकडे लक्ष द्या असं म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडेंनी आज जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीचा बुथनिहाय सुक्ष्म आढावा घेतला. कोरोनाच्या अनुषंगाने काही प्रमुख कार्यकर्त्यांनाच बोलावून त्यांना सूचना दिल्या अनेकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. निवडणूकीच्या अनुषंगाने पालकमंत्री रात्रीच बीड मुक्कामी होते. दुपारी 12.30 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयामध्ये आले.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी 20 मार्च रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीत सेवा सहकारी मतदार संघातले सर्व उमेदवार बँकेच्या उपविधी नियमानुसार अपात्र ठरले. 11 उमेदवार अपात्र ठरल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अन्य आठ मतदार संघात निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आता केवळ 8 जागांसाठी निवडणूक होत असून राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने असल्याने सदरची निवडणूक ही तिरंगी होतांना दिसून येत आहे. निवडणूक कुठलीही असो त्याकडे गांभीर्याने पाहणारे पालकमंत्री धनंजय मुंडे हे त्यानुषंगाने रात्रीच बीडमध्ये मुक्कामी आले. आज दुपारी पक्षाच्या राष्ट्रवादी भवनामध्ये बँक निवडणूकीचा आढावा घेण्यास सुरूवात केली. कोरोनाच्या अनुषंगाने गर्दी होणार नाही या स्थितीत काही मोजक्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी बोलावून घेवून बुथनिहाय सुक्ष्म आढावा ना.मुंडेंनी यावेळी घेतला. निवडणुक कुठलीही असो त्यात गाफील रहायचं नाही, मतदारांपर्यंत प्रत्यक्ष जा, कोरोनामुळे जास्त गर्दी कुठे होणार नाही याची दक्षता घ्या, तोंडाला मास्क लावा, आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान कसे पडेल यासाठी प्रत्येक मतदारांपर्यंत जा अशा सूचना देत ना.मुंडेंनी या निवडणूकीतला सुक्ष्म आढावा घेतला. तिरंगी फाईट होणार असल्याने या निवडणूकीत आपल्या पक्षाचे वर्चस्व कसे राहणार? याबाबत ना.मुंडे व्ह्युवरचना आखली. यावेळी आ.प्रकाश सोळंके, आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे, सुशीला मोराळे, रामकृष्ण बांगर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. काहींना प्रत्यक्ष बोलून तर काहींना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून निवडणूकीतल्या बारीक सारीक अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवल्या.
केशव आंधळे महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर
स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे खंदे समर्थक तथा माजी आमदार केशवराव आंधळे आज पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीच्या आढावा बैठकीतील व्यासपीठावर दिसून आले. या बैठकीला जिल्हा बँकेचे सर्व उमेदवार उपस्थित होेते