गेवराई (रिपोर्टर):- शेतामध्ये जाण्यासाठी असलेला शिवरस्ता अडवून त्या ठिकाणी बांधकाम सुरू केल्याने परिसरातील शेतकर्यांना जाण्यास रस्ता नसल्याने सदरील शेतकरी रस्त्यासाठी गेवराई तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत.
वडगाव ढोक येथील गट क्र. 215, 216, 219, 228, 229 येथील शिवरस्त्यावर अतिक्रमण करीत त्याठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आले. शिवरस्ता अडवल्याने परिसरातील शेतकर्यांना जाण्यासाठी रस्ता बंद झाला. सदरील रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी प्रल्हाद बारगजे, सुनिल ढाकणे, धर्मा बारगजे, सखाराम ढाकणे यांच्यासह आदीजण तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.