Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडकोणी निवडणुकीतून माघार घेतल्याने प्रक्रियेला फरक पडत नाही, लढण्यापूर्वीच भाजपने आत्मविश्वास गमावला;...

कोणी निवडणुकीतून माघार घेतल्याने प्रक्रियेला फरक पडत नाही, लढण्यापूर्वीच भाजपने आत्मविश्वास गमावला; आघाडीतील नेत्यांचा टोला

जिल्हा बँकेची निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण; महा विकास आघाडी ताकतीने लढणार

बीड ऑनलाईन रिपोर्टर : १९ पैकी ८ जागांवर निवडणूक होत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून मतदानाच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पक्षाने माघार घेतली असल्याची चर्चा असली तरी महाविकास आघाडी ही निवडणूक अत्यंत ताकतीने लढणार असून बीड जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अर्थ संजीवनी ठरणे आवश्यक आहे; त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे असे मत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी व्यक्त केले आहे.

एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे असाही सूर महा विकास आघाडीतील नेत्यांमधून उमटत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल अंतर्गत जिल्हा बँकेच्या ६ जागा लढवत आहेत. या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने सामोरे जात असून, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून घ्यावे, जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळाच्या कारभाराला पाहता एकूण मतदानाच्या ९०% मतदान आघाडीच्या उमेदवारांना मिळेल, असा विश्वास आघाडीचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चाताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला १००% क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर उद्या (दि. २०) मतदान प्रक्रिया पार पडत असून, प्रत्येक केंद्रावर मतदान शांततेत, नियमाप्रमाणे पार पाडावे, शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवारांच्या पतंग या चिन्हाला मतदान करावे असे आवाहन आ. प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, माजी आमदार केशवराव आंधळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे,
बन्सी अण्णा सिरसाट , विजयसिंह पंडित, रामकृष्ण बांगर, प्रा. सुशीलाताई मोराळे, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, दत्ता आबा पाटील, काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे यांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!