Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडपरळीअवैध राखेची वाहतूक करणारे सहा टिप्पर पकडले शहर पोलीसांची कारवाई

अवैध राखेची वाहतूक करणारे सहा टिप्पर पकडले शहर पोलीसांची कारवाई


परळी (रिपोर्टर):- शहरातून अवैधरित्या राखेची वाहतूक करू नये, असे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले असताना सर्रासपणे राखेची वाहतूक होऊ लागली आहे. राखेची वाहतूक करणार्‍या सहा टिप्परवर शहर पोलीसांनी कारवाई करत हे टिप्पर जप्त करण्यात आले आहे.
परळी शहरामधून अवैधरित्या राखेची वाहतूक करण्यास बंदी असतानाही काही जण लपूनछपून राखेची वाहतूक करत आहेत. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे क्षीरसागर, शरद सुर्यवंशी, बडे यांनी अवैधरित्या राख घेऊन जाणार्‍या सहा टिप्परवर कारवाई करत या गाड्या जप्त केल्या आहेत.

Most Popular

error: Content is protected !!