Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाअँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाईला सुरुवात

अँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाईला सुरुवात

केज शहरातील सर्व व्यापार्‍यांनी तात्काळ टेस्ट करावी -मेंडके
केज (रिपोर्टर):- जिल्हाभरातील सर्व व्यापार्‍यांनी अँटीजेन टेस्ट करूनच व्यवहार सुरू करावेत, अशा सक्तीच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. असे असतानाही अनेक व्यापारी अँटीजेन टेस्ट करत नसल्याचे दिसून येत आहे. केज येथील चार व्यापार्‍यांना नगरपालिका प्रशासनाने चांगलाच दणका देत चार दुकाना सील केल्या आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दररोज दोनशेपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येऊ लागले आहेत. जिल्हाभरातील सर्व व्यापार्‍यांना अँटीजेन टेस्ट करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. सूचना करूनही व्यापारी टेस्ट करत नसल्याचे दिसून येत आहे. केज नगर परिषद प्रशासनाने टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. चार दुकाना सील करण्यात आल्या. ही कारवाई तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुहास हजारे, सचिन देशपांडे, न.प.चे अधिकारी सय्यद, अनिल राऊत, रफिक कुरेशी, असद खतिब, सय्यद अतिक यांनी केली आहे. दरम्यान सर्व व्यापार्‍यांनी तात्काळ अँटीजेन टेस्ट करून घ्याव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!