Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमपेटून दिलेल्या उसाच्या फडात मृतदेह आढळला

पेटून दिलेल्या उसाच्या फडात मृतदेह आढळला

श्रीराम वस्ती परिसरात एकच खळबळ; घटनास्थळी डीवायएसपींची भेट
गेवराई (रिपोर्टर):- गळितास ऊस गेल्यानंतर उसाचा फड पेटवून देण्यात आला. यामध्ये एका शेतकर्‍याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने श्रीराम वस्ती येथे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी डीवायएसपी यांनी भेट दिली असून सदरील प्रकार खुनाचा आहे की काय, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दिगांबर विक्रम पांढरे (वय २७ वर्षे) या शेतकर्‍याचा मृतदेह जाधव यांच्या उसाच्या फडात आढळून आला आहे. जाधव यांचा ऊस नुकताच तोडण्यात आा होता. ऊस तोडल्यानंतर त्यांनी आपला फड पेटवून दिला. फड पेटवून दिल्यानंतर दिगांबर पांढरे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती गेवराई पोलीसांना झाल्यानंतर डीवायएसपींसह पोलीस निरीक्षक प्रताक नवघरे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सदरील प्रकार खुनाचा असल्याचा संशय व्यक्त केला जा आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!