Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड ताई माई अक्का मतदारांनी मारला मतदानाचा शिक्का डीसीसीच्या ८ जागांसाठी जिल्ह्यात मतदान...

ताई माई अक्का मतदारांनी मारला मतदानाचा शिक्का डीसीसीच्या ८ जागांसाठी जिल्ह्यात मतदान सुरू


मतदारांना रोखण्यासाठी भाजपा आमदार, कार्यकर्त्यांकडून प्रयत्न
बहिष्कार झुगारून मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर, काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे तर काही ठिकाणी संथगतीने मतदान सुरू, ४१ जणांचं भवितव्य आज संध्याकाळी मतदनापेटीत बंद होणार, पालकमंत्री धनंजय मुंडेंनी परळीत बजावला मतदानाचा हक्क
बीड (रिपोर्टर):- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे मोठ्या ताकतीने बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक लढवत असल्याचे पाहून हताश झालेल्या तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडेंनी काल मतदानावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली. मात्र या घोषणेनंतरही आठ जागांसाठी बीड जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणी संथगतीने तर काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न काही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यात वाद-विवाद झाले. ८ जागेसाठी ४१ उमेदवारांचे भवितव्य आज संध्याकाळी मतपेटीत बंद होत असून पालकमंत्री धनंजय मुडे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह अन्य मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व सूचनांचं पालन करत कडेकोट पोलीस बंदोबस्त मतदान प्रक्रिया सुरू असून पंकजा मुंडेंच्या घोषणेनंतरही राजाभाऊ मुंडेंसह अन्य काही भाजपा समर्थक मतदान केंद्रावर दिसून आले.
सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील ११ जागेसाठी ८७ अर्ज बॅँकेच्या उपविधी नियमानुसार बाद झाल्यानंतर बीड जिल्हा मध्यवर्ती निवडणूक राज्यभरात चर्चेत आली. निवडणुकीचे प्रकरण सुप्रिम कोर्टापर्यंत गेले. मात्र उपविधीच्या नियमाला सुप्रिम कोर्टानेही ग्राह्य धरून भाजपाच्या याचिका फेटाळल्या. त्यामुळे अन्य मतदारसंघातील आठ जागांसाठी आज जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. बीड, आष्टी, पाटोदा, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर यासह अन्य तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडेंनी बहिष्काराची घोषणा केली होती. त्यानुसार भाजपा कार्यकर्ते आणि आमदार मतदारांना मतदान करायला येऊ नका, असे आवाहन करत होते. मात्र मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदान करण्यास सुरुवात केली. परळीत पालकमंत्री धनंजय मुंडेंनी तर गेवराईत माजी आमदार अमरसिंह पंडितांनी मतदानाचा हक्क बजावला. काही मतदान केंद्रांवर संथगतीने तर काही मतदान केंद्रांवर जलदगतीने मतदान प्रक्रिया सुरू होती. गेवराईमध्ये सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १४१ पर्यंत मतदान झाले होते तर बीडमध्येही बारा वाजेपर्यंत दिडशेपर्यंत मतदान झाले होते. लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करणार्‍या भाजप नेते-कार्यकर्त्यांकडूनच मतदारांना मतदानापासून रोखण्यात येत असल्याने लोकशाहीचं खून कोण करतय? असा सवाल राष्ट्रवादी नेत्यांकडून आज उपस्थित केला जात होता. धनंजय मुंडेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडेंना पराभव दिसल्याने त्यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतल्याची जोरदार चर्चा होत होती.

भाजपाचे राजाभाऊ मुंडे मतदान केंद्रावर
तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडेंनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केल्यानंतरही भाजपाचे राजाभाऊ मुंडे हे मतदान केंद्रावर आज दिसून आले. दोन दिवसांपुर्वीच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत केशव आंधळे यांनी भाषण ठोकले होते. आपल्या गटाचे लोक जात असल्याचे पाहून तर पंकजा मुंडेंनी मतदानावर बहिष्कार टाकून निवडणुकीतून काढता पाय घेतला नाही ना? अशी चर्चा होताना दिसून येते.

निवडणुकीवर बहिष्कार मग पेंडॉल, बुथ एजंट कशासाठी?
तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडेंनी मतदानावर बहिष्काराची घोषणा केली. आज मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्राच्या बाहेर भारतीय जनता पार्टीच्या पेंडॉल दिसून आला. त्यात कार्यकर्तेही होते तर मतदान केंद्रामध्ये भाजपाचे बुथ एजंटही पहायला मिळाले.
१२ वाजेपर्यंत
३८ टक्के मतदान

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आठ जागांसाठी १३८२ मतदारांना मतदानाचा हक्क बजवायचा असून दुपारी बारा वाजेपर्यंत ५२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तालुकानिहाय टक्केवारी बीड ३२, शिरूर ३२, पाटोदा ३३, आष्टी १७, गेवराई ८५, माजलगाव ६४, धारूर ३१, वडवणी २७, अंबाजोगाई ४१, परळी २२, केजमध्ये २४ टक्के मतदान झालं होतं. अशी माहिती निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी रिपोर्टरला दिली.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...