Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकरिअरतेरा केंद्रावर एमपीएससीची परीक्षा

तेरा केंद्रावर एमपीएससीची परीक्षा


अडीच हजार विद्यार्थी हजर तर १३९० विद्यार्थी गैरहजर
बीड (रिपोर्टर):- एमपीएससीची परीक्षा राज्यभरात आज घेण्यात येत असून बीड जिल्ह्यात १३ सेंटर आहेत. यामध्ये ३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी एमपीएससीसाठी फॉर्म भरले होते. आज २ हजार ५८० विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. तर १३९० विद्यार्थी गैरहजर राहिले होते. ही परीक्षा २ सत्रात होणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याबाबत पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली आणि आज दि.२१ मार्च रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यभरात आज सदरील परीक्षा होत आहे. बीड येथे चंपावती माध्यमिक विद्यालय, मिल्लीया, संस्कार, शिवाजी विद्यालय, गुरुकुल, यशवंतराव, चंपावती इंग्लिश, चंपावती प्राथमिक, सावरकर, केएसके, छत्रपती शाहु, गव्हरमेंट पॉलिटेक्निकल, भगवान विद्यालय या तेरा ठिकाणी परीक्षा देण्यात येत आहे. ३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. यातील २ हजार ५८० विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. तर १३९० विद्यार्थी गैरहजर राहिले होते. ही परीक्षा २ सत्रामध्ये होणार आहे. सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!