आष्टी तालुक्यातील घटना
आष्टी ( रिपोर्टर ):- आष्टी येथील न्यायालयातील विधिज्ञ अॅड. शत्रुघ्न कारभारी गर्जे (वय 32) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि.27 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 च्या सुमारास समोर आली आहे.
अॅड. शत्रुघ्न गर्जे मागील काही वर्षांपासून आष्टीच्या न्यायालयात विधिज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे आष्टी तालुक्यातील कापसी येथील रहिवाशी असून त्यांच्या विवाहाला सुखी संसाराला अवघे 4 महिने उलटले होते. आज दि.27 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गहीनीनाथगडावर जाणार्या डोंगरातील रस्त्यालगत असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून दरम्यान आत्महत्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र परिसरात त्यांचा मृत्यु संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. आष्टी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन धामणगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर कापसी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.