Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडधनंजयांच्या आवाहनापुढे पंकजांचा बहिष्कार चितपट डीसीसी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

धनंजयांच्या आवाहनापुढे पंकजांचा बहिष्कार चितपट डीसीसी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय


पंकजांच्या बहिष्कारानंतरही ५८ टक्केंपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा
हक्क बजावला
धनंजय मुंडेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

बीड (रिपोर्टर):- माजी मंत्री पंकजा मुंडेंचा बहिष्कार झुगारून मतदारांनी उत्स्फुर्त मतदान केल्यानंतर आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ८ संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी ही निवडणूक एकतर्फी करून दाखवत पुन्हा एकदा तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडेंना पराभवाच्या छायेत नेऊन ठेवले. पराभव दिसत असल्यानेच पंकजा मुंडेंनी निवडणुकीच्या मतदानावर मतदानाच्या पुर्वसंध्येला बहिष्कार टाकला होता. अखेर महाविकास आघाडीला पाच जागांवर यश मिळाले. बहिष्कारानंतरही शिवसेनेचा एक, अपक्ष १ आणि धस गटाला एका जागेवर यश मिळवता आले. विशेष म्हणजे महिला राखीव मतदारसंघात पंकजा मुंडे गटाच्या सौ. प्रयागा साबळे पराभूत झाल्या.

dcc bank logo


बँकेच्या उपविधी नियमानुसार सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील अकरा जागांसाठीचे ५७ उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक राज्यभरात प्रकाश झोतात आली. माजी मंत्री पंकजा मुंडेंनी प्रतिष्ठा पणाला लावत राज्यपालांसह उच्च न्यायालयामध्ये याबाबत दाद मागितली. परंतु न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास विरोध केला. त्यामुळे उर्वरित ८ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू राहिली. परंतु मतदानाच्या पुर्वसंध्येला पंकजा मुंडेंनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. काल प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली तेव्हा मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते, आमदार मतदारांना मतदान करू नका म्हणून आवाहन करत होते, तरीही धनंजय मुंडेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत या निवडणुकीत ५८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा महिला राखीव मतदारसंघातून सौ. सुशिला शिवाजी पवार आणि सौ.कल्पना दिलीप शेळके या विजयी झाल्या. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून रविंद्र दळवी हे ७२० मते घेऊन विजयी झाले. या मतदारसंघात एकूण मतांची संख्या ८०५ होती. इतर शेती संस्था मतदारसंघात अमोल आंधळे २२३ मते घेऊन विजयी झाले. प्रतिस्पर्धी धनराज मुंडेंना ९ तर माजी मंत्री बदामराव पंडितांना केवळ २ मते मिळाले. प्रक्रिया मतदारसंघातून भाऊसाहेब नाटकर हे ४२ मते घेऊन विजयी झाले. या मतदारसंघात मतांची संख्या ४३ होती. विरोधी उमेदवाराला केवळ १ मत पडले. पतसंस्था मतदारसंघातून पापा मोदी ९३ मते घेऊन विजयी झाले. तर इतर राखीव मतदारसंघातून कल्याण आखाडे हे ७१६ मतांनी विजयी झाले. भटक्या-विमुक्त मतदारसंघातून मुंडे सुर्यभान हे विजयी झाले आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी आपला कौल पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या बाजुने दिला.

162939514 237676721439776 3140426342810438802 n

हे उमेदवार विजयी
महाविकास
आघाडी गटाचे

रविंद्र दळवी
कल्याण आखाडे
मुंडे सुर्यभान
अमोल आंधळे
भाऊसाहेब नाटकर

अपक्ष
राजकिशोर पापा मोदी
शिवसेना
कल्पना दिलीप शेळके

kalpana dilip shelke


धस गट
सुशिला शिवाजी पवार

मुंडे हरले
आंधळे जिंकले

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या शेती संस्था मतदारसंघात या वेळेस मुंडेंचा जबरदस्त हादरा बसला. या ठिकाणी माजी आमदार केशवराव आंधळे यांचे पुतणे तथा वडवणीचे माजी सरपंच दिनकरराव आंधळे यांचे पुत्र अमोल आंधळे हे २२३ मते घेऊन विजयी झाले. या ठिकाणी राजाभाऊ मुंडे यांचे सुपुत्र धनराज मुंडे यांना केवळ ९ मते पडली.

धनंजय मुंडे समर्थकांचा जल्लोष
माजी मंत्री पंकजा मुंडेंनी बहिष्कार टाकल्यानंतरही मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान करत पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतदान केले आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाल्यानंतर बँकेच्या बाहेर विजयी उमेदवारांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

माजी मंत्र्यांना केवळ दोन मते
गेवराई मतदारसंघाचे दोन वेळा नेतृत्व करणारे, राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले बदामराव पंडित यांना इतर शेती संस्था मतदारसंघात निवडणूक लढवताना अवघ्या दोन मतांवर समाधान मानावे लागले. विशेष मतदानाच्या पुर्वसंध्येला बदामरावांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती.

महाविकास
आघाडी -५
शिवसेना -१
अपक्ष -१
धस गट -१

पंकजांचा बहिष्कार, धनंजयांचे आवाहन
राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत राहिलेल्या या भाऊ-बहिणीच्या राजकारणात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून धनंजय मुंडे हे लोकांच्या गळ्यातले ताईत होताना दिसून येत असून नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत पाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती बँकेतही धनंजय मुंडेंनी आपला दबदबा कायम ठेवला. या वेळेस तर माजी मंत्री पंकजा मुंडेंनी बहिष्काराचे अस्त्र उपसले, त्याला विरोध करत मतदारांनी धनंजय मुंडेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीडची जिल्हा मध्यवर्ती बँक धनंजय मुंडेंच्या ताब्यात दिली.

Most Popular

error: Content is protected !!