Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडविजेचे बील थकले आरटीओ कार्यालयाचे कनेक्शन तोडले

विजेचे बील थकले आरटीओ कार्यालयाचे कनेक्शन तोडले

जनरेटर नसल्याने कार्यालयाचे काम खोळंबले
बीड (रिपोर्टर):- विज वितरण कंपनीची आरटीओ कार्यालयाने थकबाकी भरली नसल्याने या कार्यालयाचे विज कनेक्शन आज तोडण्यात आले. विजेअभावी कार्यालयाचे कामकाज पुर्णत: खोळंबून पडले आहे. कार्यालयात जनरेटर नसल्याने सर्व यंत्रणा बंद पडली आहे.
विज वितरण कंपनीची आरटीओ कार्यालयाकडे 84 हजार 350 रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीसाठी विज वितरण कंपनीने आरटीओ कार्यालयाला नोटीस बजावली होती. मात्र तरीही आरटीओ कार्यालयाने पैसे भरले नसल्याने कार्यालयाचे विजेचे कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे कार्यालयाचे कामकाज पुर्णत: बंद पडले. कार्यालयाकडे जनरेटरही नसल्याने संपुर्ण कामकाज ठप्प पडल्याने विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले.

Most Popular

error: Content is protected !!