Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड दोन दिवसांपासून बीड शहर अंधारात आम आदमी पार्टीचे सीओंच्या दारासमोर उपोषण

दोन दिवसांपासून बीड शहर अंधारात आम आदमी पार्टीचे सीओंच्या दारासमोर उपोषण


बीड (रिपोर्टर):- नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर अंधारात आहे. शहर अंधारात असताना नगरपालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत असून न.प. प्रशासनाला जागे करण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी न.प. सीओ यांच्या दालनासमोर उपोषण सुरू केले होते.
नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नुसताच विकासाचा दावा केला जात असतो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरात अंधार असल्याने नगरपालिका प्रशासन नेमकं काय करत आहे, असा प्रश्‍न शहरातील नागरिकांना पडला आहे. शहर अंधारात असताना प्रशासन आणि शासन झोपी गेलं की काय, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत. न.प.ला जागे करण्यासाठी आज आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष येडे, शहराध्यक्ष सय्यद सादेक, सचिव रामधन जमाले यांनी सीओंच्या दालनासमोरच आमरण उपोषण सुरू केलं होतं. या वेळी मध्यस्थी करण्याचे काम सुरू होते.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...