बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या मातोश्री फाल्गुनबाई श्रीकिसनराव देशमुख यांचे आज सकाळी पावणे नऊ वाजता वृद्धाप-काळाने दु:खद निधन झाले.
फाल्गुनबाई या ‘बाई’ नावाने सर्वपरिचीत होत्या. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी नातेवाईकांसह माकेगाव व पंचक्रोशीत मोठा परिवार जोडला होता. त्यांच्या पश्चात राजेसाहेब देशमुख, विजयकुमार देशमुख, संजय देशमुख ही तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थीवदेहावर माकेगाव येथे दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. देशमुख कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.