Sunday, April 18, 2021
No menu items!
Home Uncategorized माजलगावात वाळू माफियांवर एसपीच्या पथकाची कारवाई

माजलगावात वाळू माफियांवर एसपीच्या पथकाची कारवाई

तीन हायवा, एक जेसीबीसह १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
माजलगाव (रिपोर्टर):- माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळुचा उपसा होत आहे. याची माहिती एसपींच्या विशेष पथकाला माहिती झाल्यानंतर रात्री पुरुषोत्तम पुरी शिवारातील नदी पात्रात धाड टाकण्यात आली. या वेळी अवैध वाळू उपसा करणारे तीन हायवांसह एक जेसीबी पोलीसांनी ताब्यात घेतले असून चालक-मालकांविरोधात ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

walu upasa logo


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक होत आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती एसपींच्या पथकाला मिळाल्यानंतर रात्री त्यांनी पुरुषोत्तम शिवारात धाड टाकली. या वेळी वाळुने भरलेला एक हायवा तर दोन रिकामे आणि जेसीबी मिळून आले. पोलीसांनी ते ताब्यात घेऊन माजलगाव ग्रामीण ठाण्यात आणले. या वेळी अल्पवयीन जेसीबी चालकासह राहुल विनायकराव चव्हाण (रा. माजलगाव), अंजुम शेख सलीम (रा. पात्रुड), शेख रशीद शेख चांद (रा. टाकळी) या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदी पात्रातून आतापर्यंत या अवैध वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला असून ज्या ठिकाणाहून हे तीन हायवा आणि जेसीबी ताब्यात घेतले आहेत त्या ठिकाणचा पंचनामा करून तेथून चोरलेली सर्व वाळू या वाळु माफियांकडून वसूल करावी, अशी मागणी होत आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....