Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड मासिक सभा न घेतल्यामुळे सिरसमार्गचा सरपंच अपात्र

मासिक सभा न घेतल्यामुळे सिरसमार्गचा सरपंच अपात्र

बीड (रिपोर्टर):- मौजे सिरसमार्ग ता.गेवराई जि.बीड येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणुन अनिता महारूद्र वखरे या दि.२६.११.२०१६ पासून कार्यरत होत्या. या काळात दि.९.१२. २०१७ रोजी वार्षीक सभा झाली. यानंतर मासिक सभा सरपंचाकडून घेण्यात आली नाही. ज्यावेळी मासिक सभा झाल्याचे दाखवले त्यावेळी फक्त चार सभासद हजर असायचे व जे सभासद हजर नाहीत त्यांना सुचक व अनुमोदक दाखवले होते.
सिरसमार्गचे सरपंच यांनी जिल्हाधिकारी बीड यांचेकडे कलम ७ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणात सरपंच अनिता वखरे यांनी मासिक सभा घेतलेली नाही व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर दबाव आणुन रेकॉर्ड तयार केला हे सव र्जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. जिल्हाधिकारी यांच्याकडे सदरील प्रकरणाची सुनावणी दोन्ही बाजुने झाली तेव्हा अपिलार्थी अशोक परदेशी यांच्या वतीने ऍड.अविनाश गंडले यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सरपंच यांनी मासिक सभा न घेतल्यामुळे सिरसमार्ग येथील सरपंच अनिता महारूद्र वखरे यांचे सरपंचपद हे कलम ७ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार अपात्र घोषित केले. अपिलार्थी तर्फे ऍड.अविनाश गंडले यांनी काम पाहिले त्यांना ऍड.इम्रान पटेल, ऍड.बप्पा माने, ऍड.किरण मस्के, ऍड.सुरक्षा जावळे (वडमारे), ऍड.गोवर्धन पायाळ, ऍड.रईस पठाण, ऍड.राहुल हजारे, ऍड.राहुल मस्के यांनी सहकार्य केले.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...