Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमअवकाळीचे तांडव सुरुच वीज पडून एकाचा मृत्यू

अवकाळीचे तांडव सुरुच वीज पडून एकाचा मृत्यू


अंबा, मोसंबी, ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाल्याचे आतोनात नुकसान
बीड (रिपोर्टर):- गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने थयथयात मांडला असून आज भल्या पहाटेपासूनच वादळी वार्‍यासह ढगांच्या गडगडाटात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून यात आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर तिकडे पाटोदा तालुक्यात पारगाव घुमरा येथे ५० वर्षीय शेतकर्‍याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.


तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आज पहाटेपासून जिल्ह्याच्या विविध भागात पुन्हा हजेरी लावली. वादळी वार्‍यासह ढगाच्या गडगडाटात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले तर मोसंबी, द्राक्षे यासह अन्य फळबाभागांनाही त्याचा मोठा फटका बसला. ज्वारी, बाजरी, हरभरा, भाजीपाला, गहू आदी पिकांचे या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले तर तिकडे पाटोदा तालुक्यात पारगाव घुमरा येथील शहाजी भुजंगराव भोसले (वय ५२) हे रात्री शेतामध्ये झोपण्यासाठी गेले होते. रात्री एकच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या वेळी ते बैलगाडीतून उठून गोठ्याकडे गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. सकाळी ते घरी न परतल्याने त्यांना पाहण्यासाठी परिवारातील लोक शेतात गेले तेव्हा सदरचा प्रकार उघडकीस आला. अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यात एका शेतकर्‍याचा बळी घेतला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!