Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना सक्ती करताच व्यापार्‍यांची कोरोना चाचणीसाठी झुंबड

सक्ती करताच व्यापार्‍यांची कोरोना चाचणीसाठी झुंबड


आयटीआय सेंटरमध्ये प्रचंड गर्दी, चाचण्यासाठी आणखी सेंटर हवे

बीड: जिल्हा प्रशासनाने व्यापार्‍यांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्यानंतरही व्यापारी चाचण्या करत नसल्याचे पाहून काल दुकानांना सील लावण्याचा धडाका सुरू केल्यानंतर आज व्यापार्‍यांनी अँटीजेन चाचणी करण्यासाठी आयटीआय सेंटरमध्ये मोठी गर्दी केल्याने व्यापार्‍यांच्या चाचण्यांना प्रचंड वेळ लागत आहे. ज्या वेळेस सक्ती करण्यात आली नव्हती त्या वेळेस चाचण्यांसाठी चार सेंटर उभारले होते. आता सक्ती करण्यात आल्यानंतर केवळ एकच सेंटर उभारण्यात आल्याने प्रशासनाची उदासिनताही यातून स्पष्ट होते. दरम्यान आज दुपारपर्यंत २५३ टेस्ट करण्यात आल्या असून दोन पॉझिटिव्ह आढळले.
बीड शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या लक्षणीय वाढत असल्याचे पाहून गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी शहरातील व्यापार्‍यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. त्यासाठी शहरात चार सेंटर उभारण्यात आले होते. त्या वेळी शहरातील व्यापार्‍यांनी चाचणी करण्याबाबत उदासिनता दाखवली. कोरोना चाचणी करण्यासाठी व्यापारी फिरकले नाहीत परंतु काल जिल्हा प्रशासनाने आणि नगर पालिकेने शहरातील व्यापार्‍यांच्या दुकाना सील करण्याचा सपाटा ठेवला. त्यामुळे चाचणी करण्यासाठी आज उत्स्फूर्तपणे व्यापारी कोरोना सेंटरवर जावून पोहचले. शहरात केवळ आयटीआयमध्येच व्यापार्‍यांच्या चाचण्या केल्या जात असल्यामुळे त्याठिकाणी प्रचंड गर्दी झाली. प्रशासनाने सक्ती केल्यानंतर व्यापार्‍यांच्या चाचण्यासाठी दोन-तीन सेंटर उघडणे अपेक्षीत होते. परंतु तसे प्रशासनाने केले नाही त्यामुळे आज आयटीआय सेंटरमध्ये व्यापार्‍यांची मोठी गर्दी दिसून येत असून चाचणीसाठी व्यापार्‍यांना कित्येक तास ताटकळत बसावे लागत आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....