Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडअंधेर नगरी चौपट राजा बीडमध्ये अंधाराचं साम्राज्य

अंधेर नगरी चौपट राजा बीडमध्ये अंधाराचं साम्राज्य

बीड (रिपोर्टर):- पंधरा ते वीस दिवसापासून बीड शहरामध्ये अंधार आहे, शहर अंधारात असतांना नगर पालिका मात्र अद्यापही झोपेतून उठलेली नाही. रात्रीच्या दरम्यान गल्ली बोळात अंधार असल्याने याचा गैरफायदा भुरटे चोरटे उचलू लागले. त्याचबरोबर येतांना-जातांना नागरिकांना त्रासही सहन करावा लागतो. शहरवासियांना त्रास देण्याचा विडाच नगर पालिकेने उचलला की काय? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जावू लागल्या. शहराच्या विकासाबाबत नगराध्यक्ष नेहमीच मोठमोठे दावे करत असतात. मात्र पंधरादिवसापासून शहर अंधारात असतांना त्यांना हा प्रकार दिसत नाही का? असा सवाल व्यक्त केला जावू लागला.


बीड शहरातल्या विकासाबाबत नेहमीच प्रश्‍न चिन्ह उपस्थित राहिलेले आहे. नगराध्यक्ष मात्र नेहमीच मोठमोठे दावे करत असतात. रस्त्या, नाल्याचा प्रश्‍न तर नेहमीच आववासून उभा आहे. अनेक वार्डात व्यवस्थित रस्ते नाही, नाल्याही चांगल्या नसल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून शहरात अंधार आहे. शहर अंधारात असतांना नगर पालिकेला कसलं ही देणंघेणं नसल्याचे दिसून येत आहे. शहरात रात्री अंधार असल्याने याचा गैरफायदा भुरटे चोरटे उचलू लागले. चोर्‍याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येवू लागले. रात्रीच्या दरम्यान प्रवास करणार्‍या नागरिकांना अंधारामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागे. इतक्या दिवस शहर अंधारात असतांनाही कुठल्याही हालचाली नगर पालिका करत नाही म्हणजे ही एक आश्‍चर्याचीच बाब आहे. नगर पालिका प्रशासन झोपले की काय? अशा संतप्त प्रतिक्रिया शहरवासियातून व्यक्त केल्या जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!