Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडलॉकडाऊन शेवटचा पर्याय नाही लोक रस्त्यावर उतरतील -आ.धस

लॉकडाऊन शेवटचा पर्याय नाही लोक रस्त्यावर उतरतील -आ.धस


आष्टी (रिपोर्टर):- ज्या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत ते भाग सील करा, सरसकट लॉकडाऊन करू नका, आष्टी तालुका हा कष्टकरी, कामगार, ऊसतोड कामगारांचा आहे. हातावर पोट असणार्‍यांचा आहे. येथील व्यापारी लॉकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत, सविनय कायदे भंगाचे गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाहीत. मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. वेळप्रसंगी माझ्यावरही वेगवेगळे गुन्हे दाखल करा, गुन्ह्याची मला सवय आहे, असे म्हणत विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी संपुर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्याचा जो निर्णय घेतला आहे आष्टीच्या सर्व व्यापारी बांधवांचा विरोध आहे. माझ्यासह सर्व व्यापार्‍यांचं मत असं आहे, हातावर पोट भरणार्‍या लोकांची संख्या आमच्याकडे जास्त आहे. ती ८५ ते ९० टक्के आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर अवतीभोवती नगर जिल्ह्यातील सर्व गावे, शहरे सुरू राहणार आहेत. त्यात एकटा आष्टी तालुका हा बंद राहणार आहे. त्याचे गंभीर परिणाम सर्व व्यापार्‍यांना आणि सर्व व्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा, ज्या ठिकाणी जास्त पेशंट आहेत त्या ठिकाणी अगोदर ते रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. संपुर्ण लॉकडाऊन हा त्याच्यावर पर्याय असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचे तर करा, मी व्यापार्‍यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!