Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाबाजारात उसळली तोबा गर्दी किराणा दुकानांसह इतर दुकाने हाऊसफुल्ल

बाजारात उसळली तोबा गर्दी किराणा दुकानांसह इतर दुकाने हाऊसफुल्ल


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे कडेकोट लॉकडून करण्याचा निर्णय घेतला. आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे. दहा दिवस बंद असल्याने नागरिकांनी कालपासून बाजारात प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. किराणा दुकान कपड्याचे दुकान, भाजीपाला यासह अन्य दुकाना हाऊसफुल्ल दिसून येत होती.


गेल्या वर्षी याच महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. याचा जबरदस्त फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला होता. तोच याच दिवसात पुन्हा यावर्षी लॉकडाऊन करण्याची वेळ आली. काल जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन दहा दिवसाचे लॉकडाऊन घोषीत केले. लॉकडाऊन घोषीत होताच बीड शहरासह इतर शहरांच्या ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. दहा दिवसाचा किराणा व इतर साहित्य खरेदी करण्याची लगबग आज दुसर्‍या दिवशीही नागरिकांची सुरुच आहे. किराणा दुकानांसह कपड्याचे दुकान यासह अन्य दुकानातून आज गर्दी दिसून येत होती.

164891439 209828080939717 6110788084409016283 n


विद्यार्थी, नागरीक गावी परतू लागले

दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शहरातील विद्यार्थी आणि नागरिक आपआपल्या गावी परतत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. बीड येथील बसस्थानकात आज नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. त्याचबरोबर तालुक्यातील बसस्थानकातही अशाच पद्धतीची गर्दी दिसून आली.


चढ्या भावाने किराणा मालाची विक्री

लॉकडाऊनमध्ये काही व्यापारी संधी साधून घेत असतात. गेल्या वर्षी अनेकांनी चढ्या भावाने मालाची विक्री करून लोकांची आर्थिक लूट केली. आजही काही ठिकाणी अशीच परिस्थिती दिसून आली. जो तो किराणा दुकानावर दिसून येत असल्याने अनेक दुकानदारांनी खाद्य तेलासह इतर साहित्याचे भाव वाढवले अल्याचे दिसून आले.

Most Popular

error: Content is protected !!