Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाआ. धसांच्या आक्रमतेपुढे प्रशासनाची नरमाईची भूमिका

आ. धसांच्या आक्रमतेपुढे प्रशासनाची नरमाईची भूमिका


आष्टी(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण बीड जिल्हा जरी कडकडीत बंद असला तरी आज सकाळीच शहरातील सर्वच दुकाने स्वत;आ.सुरेश धसांनी फिरून उघण्यास सांगत उघडण्यात आली.सुरूवातीला पोलिसांनी दुकाने बंद करत होते.परंतु त्यानंतर नगर पंचायत कार्यालयात आ.सुरेश धस,व्यापारी, आणि प्रशासन यांची बैठक सुमारे दोन तास होऊन उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर
दुपारी एक नंतर सर्व दुकाने बंद करून पुढील तीन दिवस जिल्हाधिकारी यांच्या नियमाप्रमाणे लॉकडाऊन होऊन पुन्हा दि.३० पासून पुढे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत सर्वच व्यवव्हार सुरू राहण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी द्यावी नसता आम्ही तर दुकाने सुरू करण्याचा इशारा आ.सुरेश धस यांनी दिला.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गुरूवारी मध्यराञी पासून संपूर्ण बीड जिल्हा लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला.परंतु आम्हाला हे लॉकडाऊन मान्य नाही म्हणत आम्ही दुकाने सुरू ठेवण्याचा पविञा आष्टीच्या व्यापा-यांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.सकाळपासूनच उपजिल्हिधिकारी सुशांत शिंदे,उपविभागीय अधिकारी विजय लगारे,तहसिलदार राजाभाऊ कदम,नायब तहसिलदार निलीमा थेऊरकर,नगर पंचायतच्या मुख्यधिकारी निता अंधारे, संजय कुलकर्णी यांच्यासह सर्व अधिका-यांची व पोलिस प्रशासनाची चांगलीच झुंबड उडाली.स्वत; आ.सुरेश धस हे सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील व्यापा-यांना दुकाने उघडण्यास सांगत असल्याने व्यापा-यांनीही बिनधास्त दुकाने उघडली.सकाळी दहाच्या दरम्यान नगर पंचायत कार्यालयात आ.सुरेश धस,व्यापारी व अधिकारी यांची बैठक होऊन आम्हाला दररोज चार तास दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्या तसेच शहरातील सर्व पेट्रोलपंप सुरू करा यासह इतर मागण्या करण्यात आल्या तडजोडी अंती उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी आष्टीची सर्व परिस्थिती जिल्हाधिकारी यांना सांगत दि.२७,२८ व २९ रोजी हे तीन दिवस आष्टी कडकडीत बंद तर पुढील काळात दररोज सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे लेखी आश्वसन दिल्या नंतर सदरील अंदोलन मागे घेण्यात आले आहे.
दहा दिवसांचा लॉकडाऊन मान्य नाही पोलिस बळावर सुरु ठेवायचे असेल तर लाठ्या काठ्या खाण्याची तयारी तालुक्यातील सर्व व्यावसायिकांचे दुकाने ९ ते १ सर्व सुरु ठेवण्याची परवानगी द्या अन्यथा उद्यापासून सर्वच दुकाने तीन दिवसांसाठी बंद करा पोलीसांनी गुन्हे दाखल केले तरी आम्ही षंढ म्हणून वावरणार नाहीत लाठ्या काठ्या खाण्याची आमची तयारी आहे.१० दिवसांचा लॉकडाऊन आम्हाला मान्य नाही – आ,सुरेश धस

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!