Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनानगरपंचायतच्या कर्मचार्‍यांकडून शहराची पाहणी

नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांकडून शहराची पाहणी

नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये
केज (रिपोर्टर):- केज शहरामध्ये लॉकडाऊनची अमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची पाहणी आज नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत केली. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन कर्मचार्‍यांच्या वतीने करण्यात आले. कालपासून जिल्हाभरामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. आज नगरपंचायतचे अधीक्षक सुरेश होट्टे, अन्वर सय्यद, सय्यद अतिक, पोलीस कर्मचारी तांदळे व इतरांनी शहराची पाहणी केली. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन कर्मचार्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!