Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या शेख महेबूब यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या शेख महेबूब यांची गृहमंत्र्यांकडे मागणी


बीड (रिपोर्टर):- एमपीएससीच्या परीक्षेसंदर्भात राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यामध्ये काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. विद्यार्थ्यांचे भविष्य पाहता त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे परत घेण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.
११ मार्च २०२१ रोजी एमपीएससीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो याचा विचार करत सदरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. दरम्यान ना. जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शेख महेबूब यांना आश्‍वासन दिले आहे. यावेळी महेबूब यांच्या समवेत ठाणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....