Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड नर्सिंगचे हॉस्टेल, डोळ्याचा वार्ड होणार कोरोना वार्ड दिडशे खाटांसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला

नर्सिंगचे हॉस्टेल, डोळ्याचा वार्ड होणार कोरोना वार्ड दिडशे खाटांसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला


बीड (रिपोर्टर):- जिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना रूग्णासाठी ४०० खाटा उपलब्ध असून रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी दिडशे विस्तारीत खाटासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला जिल्हा रूग्णालयाकडून देण्यात येत असून जिल्हा रूग्णालयाअंतर्गत मुलींचे नर्सिंग हॉस्टेल आणि डोळ्याच्या रूग्णांचा वार्ड याठिकाणी कोरोना रूग्णाचा वार्ड करण्यात येणार आहे अशी माहिती निवासी अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राठोड यांनी दिली.
बीड जिल्ह्यात आणि बीड शहरात दररोज कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बीड जिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना रूग्णासाठी अडीचशे खाटा आगोदर आरक्षित करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर रूग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेवून यामध्ये दिडशे खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तरी ही जिल्ह्यात आणि शहरामध्ये कोरोना रूगणाच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात वाढलेल्या रूग्णांची संख्या लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या खाटा कमी पडतील त्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या अख्त्यारीत नर्सिंग कॉलेजचे हॉस्टेल आणि डोळ्याच्या रूग्णांचा वार्ड याठिकाणी कोरोना रूग्णांसाठी वार्ड करण्यात येणार आहे. त्यासाठीचा खाटा वाढीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येत आहे. त्यासोबतच बीड शहरातील १२ खासगी रूग्णालय हे कोरोना रूग्णांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत. जे खासगी रूग्णालय कोरोना रूग्णालयासाठी प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात येत आहे अशाच रूग्णालयाला कोरोना रूग्णालय चालविण्याची परवानगी देण्यात येत आहे.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...