Monday, April 19, 2021
No menu items!
Home कोरोना बायकोची डिलेव्हरी झाली, पाहुणा वारला, शेजारच्याचे औषध आणायचे, तमक्याचा अपघात झाला म्हणत...

बायकोची डिलेव्हरी झाली, पाहुणा वारला, शेजारच्याचे औषध आणायचे, तमक्याचा अपघात झाला म्हणत सडकफिरे सर्रास रस्त्यावर

पोलीसांवर सडकफिर्‍यांसमोर हात जोडण्याची वेळ
लोकाहो, प्रशासनाच्या संयामाकडे दुर्लक्ष करू नका, हे तीन दिवस तरी घरात थांबा, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करा

बीड (रिपोर्टर):- कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडून केल्यानंतर लॉकडाऊनच्या दुसर्‍या दिवशी बीड शहरात मात्र सडकफिर्‍यांनी उच्छाद् मांडला. बायकोची डिलेव्हरी झाली, पाहुणा वारला, शेजारच्याचे औषध आणायचेत, आमक्याचा अपघात झाला अशा एक ना अनेक बतावण्या देत सर्रासपणे बाहेर फिरणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. पोलीसांनी अक्षरश: हात जोडून गरात बसण्याची विनंती केली. मात्र सडकफिरे बाहेर फिरताना दिसून येत आहेत. प्रशासनाने लवती भूमिका घेत धूलीवंदनानंतर लॉकडाऊन शिथील करण्याचे आश्‍वासन दिले. आता तरी सडकफिर्‍यांनी बाहेर न फिरता घरात बसून लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे.
लॉकडाऊनला वाढता विरोध पाहत रस्त्यावर फिरणार्‍या लोकांना बळाचा वापर न करता समजून सांगा अशा सूचना जिल्हधिकार्‍यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या. गेल्या दोन दिवसांपासून शहरात लॉकडाऊन सुरू आहे. पोलीसांच्या संयमी भूमिकेचा फायदा उठवत सडकफिरे सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसून येतात. शहरातल्या छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायिकांनी आपले उद्योग बंद ठेवले मात्र सडकफिरे अक्षरश: रस्त्यावर उतरले. पोलीसांनी हटकले तर बायकोची डिलेव्हरी झाली, अमक्याचा अपघात झाला, पाहुणा वारला, शेजारच्यांचे औषध आणायचे, पोरीला परीक्षेला पाठवायचय, असे एक ना अनेक धादांत खोटे कारणे सांगत बाहेर पडताना दिसून येत आहेत. पोलीस मात्र संयमाने सडकफिर्‍यांना बोलताना दिसून आले. शिवाजी महाराज चौकात तर अक्षरश: पोलीस अधिकार्‍यांनी तुमच्यासमोर हात जोडण्याची वेळ आली म्हणत हात जोडून धादांत खोटे कारणे सांगू नका, घरात बसा, म्हणत सडकफिर्‍यांना पुन्हा बाहेर आले तर कारवाई करू असा दमही दिला. रिपोर्टरने शहरात फेरफटका मारला असता सडकफिरे वेगवेगळे कारणे देत फिरत असल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यातही धुलीवंदनानंतर लॉकडाऊनमध्ये प्रशासन शिथिलता आणणार आहे. एवढे तीन दिवस तरी लोकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...