बीड (रिपोर्टर):- जमीनीच्या वादातून एका 27 वर्षीय युवकाला दोन दिवसांपुर्वी मोंढा रोडवरील एका दुकानासमोर बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याचा हात मोडला असून त्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथील हमाली करणारा 27 वर्षीय हरीभाऊ मतकर याला शेतातील वादातून बाचाबाची होऊन त्यात त्याला लोखंडी गजने बेदम मारहाण केल्याने त्यात त्याचा हात मोडला असून त्याला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुनिल शाहूराव आगाम याचा भाऊ हनुमान शाहूराव आगाम या दोघा भावांसह इतर चार जणांनी हरीभाऊ या युवकाला मारहाण केली. बीड शहर पोलीसांना ही बाब समजल्यानतंर खासगी रुग्णालयात जावून विचारपूस केल्यानंतर वरील चौघा जणांविरुद्ध भा.दं.वि.325, 324, 327, 147 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अंतराम हे करत आहेत.