Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमवादग्रस्त मजकूर फॉरवर्ड करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

वादग्रस्त मजकूर फॉरवर्ड करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर):- दोन समाजात तेढ निर्माण होईल असा वादग्रस्त मॅसेज वॉटस्अ‍ॅपवर फॉरवर्ड करणार्‍या अल्पवयीन मुलावर माजलगाव ग्रामीण पोलीसात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथील एका अल्पवयीन मुलाने एका समाजाच्या भावना दुखावतील असा वादग्रस्त मजकूर फॉरवर्ड केल्याने पात्रूड गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाचशे ते सातशे तरुण पात्रुड चौकीजवळ रात्री जमून वादग्रस्त मजकूर फॉरवर्ड करणार्‍याविरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी करताच घटनेचे गांभीर्य ओळखून माजलगाव विभागाचे डीवायएसपी सुरेश पाटील, माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पीआय संतोष पाटील यांनी पात्रूड येथे भेट देऊन युवकांची समजूत काढून वादग्रस्त मजकूर फॉरवर्ड करणार्‍या मुलावर 295, 505 कलमानुसार गुुन्हा दाखल केला. गावात तणावपुर्ण शांतता असल्याने आरसीबीच्या जवानांसह पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!