Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड अखेर सडकफिर्‍यांना पोलिसांचा प्रसाद खासबाग, शिवाजी चौक, बशीरगंजमध्ये पोलीसांची मोहीम

अखेर सडकफिर्‍यांना पोलिसांचा प्रसाद खासबाग, शिवाजी चौक, बशीरगंजमध्ये पोलीसांची मोहीम


बीड (रिपोर्टर):- गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये र्लाकडाऊन सुरू असताना काही नागरिक शहरात दुचाकीवरून फिरत आहेत. गेले दोन दिवस पोलीसांनी या नागरिकांना विचारपूस करून सोडून दिले मात्र पोलीस मारहाण करत नसल्याचे पाहून मोकाट फिरणार्‍यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे आज सकाळी शहरातील खासबाग, शिवाजी चौक आणि बशीरगंजमध्ये विना काम फिरणार्‍या नागरिकांना पोलीसानीं चांगलाच प्रसाद दिला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी 25 मार्चपासून जिल्ह्यात 10 दिवसाचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या बाबतीत पोलीसांना संयमाची भूमिका घेण्याचा सल्ला या वेळी जिल्हाधिकर्‍यांनी दिला होता. मात्र पोलीसांच्या नरमाईचा गैरफायदा घेत शहरात काही मोकाट फिरणार्‍यांची संख्या वाढतच जात असल्यामुळे आज पोलीसांनी या मोकाट फिरणार्‍यांविरोधात सक्तीची भूमिका घेत त्यांना चांगलाच प्रसाद दिला. खासबाग, बशीरगंज, शिवाजी चौक भागात पोलीसांनी सडकफिर्‍यांविरोधात कारवाई केली.

बीडमध्ये 59 तर
जिल्ह्यात 284 पॉझिटिव्ह
आरोग्य विभागाने काल जिल्हाभरातून 2 हजार 983 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये 2 हजार 699 संशयित निगेटिव्ह आले आहे तर 284 जण बाधीत आढळून आले आहेत. आजच्या अहवालात बीडचा आकडा 59 आहे. त्यापाठोपाठ गेवराई 5, आष्टी 30, पाटोदा 17, माजलगाव 32, शिरूर 6, अंबाजोगाई 73, धारूर 8, केज 13, परळी 37 आणि वडवणी तालुक्यात 4 रुग्ण आढळले आहेत.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...