Wednesday, September 22, 2021
No menu items!
HomeUncategorizedbeed reporter- शब्दांची होळी , बुरा ना मानो होली हैं...

beed reporter- शब्दांची होळी , बुरा ना मानो होली हैं…

  

महाराज्याला कोरोनाने ग्रासलं… सत्ताधार्‍यांच्या तोंडचं पाणी पळालं… विरोधकांच्या हाती कोलीत सापडलं… वर्क फॉर होमने घराघरातलं आंथरूण गरम केलं… मंत्रालयाला काम देवानं घेरंल… ‘देव’ईंद्राच्या ‘अमृत’वाणीचं इक ठरलं… पोलीसांनी ‘खा’कीतीक बीचा किताब मिळवलं… वाघ्याची मांजर अन् जानत्याच्या जागरात कमळाबाईचा राग पुन्हा येईन म्हणत-म्हणत नशिब करतय घात…ऐका हो ऐका बीड जिल्ह्याच्या मायबापा… बाहेर वाढलाय कोरोनाचा धोका… सोशल डिस्टंसचा विचार करा पक्का… आष्टीत प्रशासनाला ‘धस’का… पंकजांच्या डिसीसीवर धनुभाऊंचा एक्का… क्षीराच्या सागरात दत्ताचा जग तरी उगवतो रवि दीप रोज… गेवराईत अमरतवाला आमदारकीची खोत… माजलगावात मंत्री पदाचे स्वप्न पडतात रोज… ऐका हो ऐका बीड जिल्ह्याच्या मायबापा…दवंडीवाला लॉकडाऊनच्या सुनसान रस्त्यावर दवंडी देत निघाला होता…घरातले बायाबापुडे खिडकीतून डोकावून पाहत होते… दवंडीवाला जसं पुढं सरकत होता, तसे बायाबापुडे खिडकीतून अलगद घरातल्या खोल्यांमध्ये फिरत होते… लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही… कोणाशी बोलता येत नाही… संपर्क ठेवता येत नाही… त्यात सुनसान रस्त्यावर एखादी आरोळी आली की, सहाजिक घरातल्या लोकांचे खिडकीतून डोकावणे… चालू असायचे… अशातच दवंडीवालाला आला… तो पुढे सरकत शिवाजी महाराजांच्या चौकात आल्यानंतर त्याने पुन्हा आरोळी ठोकली… तसं झेडपी आवारातून दवंडीवाल्याच्या कानी आवाज पडला… अरे ये दवंडीवाल्या, अरे ऐकतोस का सुकाळीच्या… थांब की वाईज! दवंडीवाला रागाने थांबला… कोण रं अवाज देतयं म्हणत पाठमोरा झाला… तसं झेडपी आवारात पांढर्‍या कपड्यातला म्हतारा दिसला… तोंडाला मास्क, हातात बीडी असलेला तात्या त्याला बोलत होता… दवंडीवाला तात्याजवळ गेला… तसं तात्यानं दवंडीवाल्याकडं डबड मागितलं… लई येळच्यानं बीडीची तलब झाली… बीडी हाय पण डबडं नायं… तुझ्याकड आहे का? लॉकडाऊनमुळं सगळं बंद आहे… कवा कोरोना, रस्त्यावर कधी माणसं दिसतील असं झालयं… दवंडीवाल्याकडं डबड नव्हतं, तसं तात्याचा हेरमुड झाला… अन् तात्यानं दवंडीवाल्याला मायला तुझ्याकडं डबड नाही म्हणत शिव्याशाप द्यायला सुरूवात केली… दवंडीवालाही म्हणाला, तात्या वय झालय तुमचं आता गपगुमान घरात बसायचं… म्हतारपणी कशाला बाहेर यायचं? त्यावर तात्या म्हणाले, मी कशानरं म्हतारा, मी अजून तरणाताठा हाई… तशी चवळीची शेंग. तात्याचा तो चेंकाळपणा पाहून दवंडीवाला आधीकच कातवला… तेंव्हा तात्यानं कोण रं तू… मला असं बोलतोस… तात्या मी धर्माचं पोरगं हाय धोंडया… तात्या म्हणाले, कसली रं दवंडी… एक तर रस्त्यावर माणूस नाय अन् तू दवंडी देत सुटलास… काय नाई व तात्या… असा निरूत्साही स्वर दवंडीवाल्यानी काढला… तेंव्हा तात्या म्हणाले, का रं आवंदा जास्तच नाराज दिसतुस… गेल्या साली हवा सर्द हैं खिडकी बंद करलो म्हणत सिनिमा बघायचं सांगत होतास… कुठला रं तो सिनिमा..? हं.. संगितची महती संतोषीमाताच्या चरणी… मस्त होता बघ केज निवासाची महती सांगणारा… अवंदा हाई की नाही तसा सिनिमा? तात्याच्या या प्रश्नावर धोंड्या मनातली मनात… म्हतार्‍यालाही बराच नाद दिसतोय, चांगलच चेकाळतय म्हतारं… असा पुटपुटत होता… तेवढ्या तात्या म्हणाले, अरे आवंदा हाई की नाही सिनिमा? तेवढ्यात धोंड्या म्हणाला, हाई की तात्या… आवंदाचा सिनिमा ‘बाहरवाली का कहर’ आहे… तात्या म्हणाला, बाहर वाली का कहर? हेव तर आपल्याकडं आला नाही… धोंड्या म्हणाला, ममईत काही दिवस चालला इकडं नाही आला… तात्या म्हणाले का रं? धोंड्या, म्हणतात बुवा त्यातली हिरोईन पिक्चरच्या ‘जया’त नाही तर ‘धना’त बेलायची… लोकाला ते पटलं नाही… मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली… अशीच होती ती… म्हणून अनु..रेणू तोडका झाला… अन् भाऊ आकाश एवढा… तात्या म्हणाले, तु काय म्हणतोस मला काई समजत नाही… ते जाऊदे दवंडी कशाची देतोस ते सांग… तात्या, आवंदा दुष्काळ-विष्काळ विसरलेत लोक, कोरोना-कोरोना, डरोना-डरोना याचीच धुंद… पाणी हाय पण लाईन नाय… बँकेत पैका हाय पण खिशात दाणा नाय… गावात पुढारी हाई पण त्याच्या दारात देणेकरी, निवडुण दिलेले निवडंग झाले… असं म्हणत धोंड्या सुसाट वेगाने निघाला होता… त्याच बोलणं आडवत तात्या म्हणाले, अरं थांब लेकाच्या तु काय बोलतूस त्यात कळत नाही… जाऊद्या तात्या, तुमचं वय झालं… तुम्हाला कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही अन् आता डोक्यात बी काही शिरत नाही… धोंड्याच्या या बोलण्यावर तात्या खेकसला… गेल्या साली नमोरूग्ण म्हणलास अन् या वर्षी डोकं नाही म्हणतूस… अरं या कोरोनाने तर चांगल्या-चांगल्याच दुकान लावलं… धोंड्या म्हणाला, अवं तात्या नमो रूग्णापेक्षा तो कोरोना बरा… त्याला तरी नीट करता येतं… नमो रूग्णाला तर सरणावरच जावं लागतं… तुम्हाला कोरोना हाय का? तुम्ही नमोरूग्ण हाय? तात्या म्हणाले, मी नमो रूग्ण तर नाहीच अन् कोराना बाधीतही नाही… माझ्या नाकाला, तोंडाला मास्क असतो… मी लोकात फिरत नाही… घरीच बसतो… धोंड्या म्हणाला, आता म्हतारपणी घरातच पडून रहावं… तात्या पुन्हा खेकासला… म्हतारा म्हणालास तर कानसुल सोलीन… दवंडी कशाची ती मला सांग… धोंड्या म्हणाला, आमदारकीचं इलक्शन झालं…कोरोनानं कलंकीत केलं… बीडच्या शिवगामीचं राज्य गेलं… धनुभाऊचं शुद्रतव्य धुवून निघालं… बर त्याचं काय? अव तात्या, आवंदा धुरवडीची पारटी हाय… ती बी धनुभाऊंनी ठेवलीया… ती ही प्रभु वैद्यनाथाच्या परळीत… तात्या म्हणाले, काय रं असतं त्या पारटीत… धोंडीबा म्हणाला, चपटी, बोटी, हातभट्टी, देशी, विदेशी, विलायती, थंडाई, घोटा सर्वच गोष्टी असतात… कमी काहीच नसतं… खायला-प्यायला मनसोक्त आहे… दवंडीवाला दवंडी देवून निघाला… तात्याही विना शिलगवलेली बीडी तोंडात धरत झुरका मारण्याचा आव आणत तेथून निघाला… दोघांच संभाषण मी लांबून ऐकत होतो… म्हटलं, चला उद्या भन्नाट बातमी भेटणार… मी माझं घरी निघून आलो.
आज सकाळी उठलो… आंघोळ केली… होळी पेटवली… तिच्या समोर दोन-दोन हाताने बोंब ठोकली… कोरोना व्हायरस होळीत पेटवावा तसा मी होळीचा भडका केला… पुरणपोळी खाल्ली अन् निघालो पारटीचं ठिकाण पहायला… गेल्या वर्षी घराबाहेर पडल्यानंतर होळीचे लाकडं जमा करणारे पोरं दिसायचे… आवंदा लॉकडाऊनमुळे पोरं दिसणार नाईत… आपला उद्दार होणार नाही… कानावर अश्लाग्य शिव्या पडणार नाही… असं समजून मी अण्णाभाऊ साठे चौकात आलो… तिथ पोलीसांचा गराडा होताच… म्हटलं, चला आज नुसते पोलीस आहेत… तेवढ्यात कानावर आचरट, विचरट आवाज ऐकू येवू लागले… होळीसाठी लाकडं गोळा करणारे पोरं बोंब ठोकत होते… त्यांनी मला पाहिलं… अन् बोंबलायला लागले… होळी रे होळी पुरणाची पोळी… नशासाठी आवंदा कोरोनाची गोळी… त्यापुढे जात एक जण म्हणाला, होळी रे होळी पोलीसांच्या गाडीत बंदुकीची गोळी… बरं झालं गाडीत हा शब्द त्यानं.. नाकातून नाही उच्चारला… नाही तर दुसरच काही ऐकायला आलं असत… अन् पार्श्वभागाचा दर्शन झालं असतं… मी म्हटलं, आवंदा पोरं बाहेर फिरणार नसतील… मात्र पोरं फिरत होते… पोलीसा त्यांच्या पाठीमागे लागत होते… आण्णाभाऊ साठे चौकातून शिवछत्र जवळं होतं… तितही होळी पेटवलीं होती… गेवराईकरांच्या नव्हतं मनात… मेहुण्याच्या पदरात आमदारकीचं दान… आमची नुसतीच राजेशाही शान… तेथून पुढं संदिप सेनेचं टोळकं पुढं दिसलं… म्हटलं, हे कारटे गप गुमान जातेल, मात्र त्यांनीही काकाच्या नावानं बोंब मारली… तेवढ्यात पोलीस त्यांच्या पाठीमागे धावली… पुढं मी बसस्थानकात आलो… लॉकडाऊनमुळे एसट्याही बंद… मला तर परळीला जायचं… मग एका मित्राला बोलून घेतलं… त्याच्या सोबत थेट वैद्यनाथाच्या परळीला गेलो… सामसुम रस्ते… पाहून आवंदाची होळी आणि धुरवडी होईल असं वाटत नव्हतं… तस मी परळीत पोहोचलो… आयोजकांनी पारटीस्थळाकडे जाणार्‍या कमानी शहरभरात लावल्या होत्या… नुकताच डिसीसी बँकाच्या विजयाचा गुलाल रस्त्यावर होता… स्वागताच्या कमानीही होत्या… त्यावरच बॅनर बदललं.. मी त्या कमानीच्या दिशा दर्शकातून पारटी स्थळी गेलो… अन् माझ्या तोंडून आबाबाऽऽऽ काय तो थाट, काय ती सजावट, काय तो शामियाना… मी बघतच राहिलोे… दहा पंधरा लोकांच्या पारटीसाठी सोशल डिस्टंसमुळे पाच-दहा एक्करात शामियाना उभारला होता… सजावट केली होती… टेबलावर चपटी, बोटी, हातभट्टी, देशी, विदेशी, विलायती, थंडाई, घोटा आणि हुक्का ठेवला होता… मी हे सर्व झगमगाट पाहून आयोजकाच्या टिमकडे गेलो… त्याला विचारलं… आज नाईंटी-शाईंटी हाई का? तो म्हणाला, आज तर नाही परंतू उद्या नक्की आहे… परिसराची पाहणी केली… उद्या मी कुठल्या जागेवर बसणार आहे… ती जागा नक्की केली अन् तेथून घरी परतलो.
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे मी उठलो… स्नानसंध्या केली… अन् स्वत:ची गाडी घेवून थेट परळीला गेलो… तेंव्हा पारटीस्थळी आयोजकांचे राबते राबत होते… नवकर चाकर होते… हावशे, नवशे अन् गवशेही जमा झाले होते… जो तो पारटीच्या तयारीला लागला होता… पारटीचं शिल जपण्यासाठी प्रकाश पाडणारे दिवे लावण्यात आले होते… कोणाला धैर्य शिकवण्याची गरज नव्हती… आता वाट पाहिली जात होती ती आयोजकासह पाहुण्यांची… आज या पारटीला नेमकं कोण आधी येणार याचा विचार करत असतांनाच… चोरावर मोर शिरजोर… अन् नशिब थोर… असलेले विधान परिषदेचे आमदार संजय दौंड आपल्या गाडीने तेथे आले… प्रथम आम्हा बाहेरच्या पत्रकारांना कोण आल कळलंच नाही… पाच पन्नास किलोचा पोरगा की माणुस? हे समजलं नाही… परंतू उपस्थितीतांनी आमदार साहेब या… म्हटल्यावर लक्षात आलं… धनुभाऊच्या उपकाराचीं परतफेड पारटीच्या व्यवस्थापनातून संजु बाबा करतात काय? या प्रश्नात असतांनाच… डफावर हात तुणतुण्याचा… पंडित हा गेवराईचा प्राण… गातो जाणत्या राजाचे गुणगाण… जी..जी..हो..चा पोवाडा कानावर पडला… उपस्थित समजून गेले… शिवछत्राचे थोरले स्पष्ट बोलतात म्हणून कडुकारले… अमरसिंह शामियान्यात आले… पाठीमागे हात बांधुन, व्यवस्थापनाची पाहणी करत उपस्थितांना सूचना देत असतांना धसकट, धोेंड्यांच्या दुष्काळी आष्टीचे बाळासाहेब आजबे कधी आले अन् अमरसिंहांच्या पाठिशी उभा राहिले हे कळालच नाही… पारटीचा वेळ जवळ येथ होती… पाहुणे यायला सुरूवात झाली होती… तोंडात तोंबरा आणि गालगोबरा, टवटवीत अन् ठणठणीत जेंव्हा शामियानात आले… तेंव्हा लख्ख प्रकाश पडला… तो उजाड पाहताच… दादा आले… दादा आलेचा… गजर करत संजू बाबा आणि बाळ धावत गेले… तेवढ्यात रूपाने देखना… डोळ्यावर चष्मा… काकाच्या गादीवरचा नमुना… हाय हॅलो करत जसाच शामियान्यात येवू लागला… तसा उपस्थित हौशा नवशांनी सेल्फीसाठी झुंबड केली… त्या गोंधळातच… शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती… आमदारकीसाठी करतो आम्ही कुठेही रेटारेटी… म्हणत विनायक बाबू आले… तेवढ्यात पोटासाठी नाचतो मी पर्वा कोणाची…़हे गाणं कानावर पडलं… म्हटलं नक्कीच गंगथडीची गाडी दिसतेय… लोकांचे प्रश्न सोडवायचेत मग… घरचे असो की दारचे… मी तिथं जाणार, गेवराईला लक्ष्मणयुक्त करणार… असा दावा करणारे लक्ष्मण अण्णा आले… पाठोपाठ केजच्या नमिताताई शामियान्याबाहेर उभ्या ठाकल्या… तेवढ्यात तळ्यामळ्यात तुणतुण आलं गळ्यात… असे राजकारणातले थोरले घरचे थोरले आले अन् गपगुमान शामियान्यात जावून बसले… पाठपोठ वरून रांगडा दणकट काळा… मराठमोळा ढोल बडवीत आला… तसे उपस्थितांना उमजून चुकले… दगडधोंड्यात उगवणारं धसकट… शामियान्यात उगवलं… या दुष्काळी वातावरणात सुन सायबा सुन प्यार की धुन… कानी पडली… तसे ताईसाहेब आल्याचे संकेत मिळाले… सोबत प्रितम होत्याच… तेवढ्यात आकाशवाणी कानी पडली… मै जब-जब बिखरा हॅुं, तब-तब दुगनी रफ्तारसे निखरा हुँ हा आवाज कानी येताच पारटीचे आयोजक शामियान्यात आल्याची वर्दी मिळाली.
धनुभाऊ थेट शामियान्यात गेले… उपस्थित सर्वांना नमस्कार-चमत्कार केला… डिसीसीच्या विजयाचा गुलाल… कपाळी असल्याने… इथं कोणी पारटीवर बहिष्कार टाकायचा नाही अशी अट धनु भाऊंनी टाकली… तेवढ्यात घर में बच्चा भी शेर होता हैं… असा आवाज आला… तो धसमुसळेपणाच होता… तसं पंकजांच्या तोंडी हसू फुटलं… गालावर खळी डोळ्यात धुंदी… परभवाची केली कोणी कर्णी… असे नमिता पुटपुटल्या… धनु भाऊच्या काढलेल्या खोडीत प्रकाश दादांनी सावरासारव केली… अन् पारटीला आलेल्या उपस्थितांनी… शामियान्यात आपल्या जागा धरल्या… सुर्य डोक्यावर आला होता… उन्हाची तिव्रता वाढली होती… पारटीत आलेल्या पाहुण्यांनी मास्क काढून ठेवले होते… चपटी, बोटी, हातभट्टी, देशी, विदेशी, विलायती, थंडाई, घोटा, सॉफ्ट ड्रींक, कोल्ड्रींकचे ग्लास भरले होते… फेसाळलेल्या ग्लासांना तोंड कधी लावणार असं झालं होता… काही क्षणात ग्लास रिचवले गेले… अन् गाण्याच्या भेंड्या परंपरेनुसार सुरू झाल्या… आधी कोण उठणार…. याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतांनाच… दीड दिसात अन्… संजू बाबा गाण्याच्या फडात उभे राहिले… अन् दौडांचं स्वप्न सांगू लागले…

cartoon

स्वप्न झाले रे साकार…
पायी आमदारकीचे बोल…
धनुभाऊंच्या सुरात मिळवीला सुर…
सहा महिन्यात मिळाली आमदारकीची ताल…
स्वप्न झाले रे साकार…
असं म्हणत संजय दौंड खाली बसले… गाण तसं मोडकं तोडकं… तेही वर्षा सहा महिन्याचचं वाटलं… आता कोण उठतय याकडे सर्वांचे लक्ष असतांनाच… अनपेक्षितपणे पंकजा उठल्या आणि म्हणून लागल्या…

pankaja munde


खेळ कोणाला दैवाचा कळला…
मी असो, हा असो, कोणी असो…
दैव लेखणी कोणा कधी टळला…
सत्ता असुन भुरळ का यावा…
भावमनीचा पुन्हा कळवा…
मनात सीएमचा मेळा भरवा…
खेळ कोणाचा देवइंद्रा कळवा…
असं म्हणत ताई खाली बसणार तोच… कुजबुज सुरू झाली… हे गेल्या वर्षीचं गाणं आहे… नव गाण म्हणा… अशी मागणणी झाली… तशा पंकजा पुन्हा म्हणाल्या…
करा या कोरोनावरती मात…
गप्प रहावे बसून या घरात…
ताईंच्या या कडव्याचा अर्थ, शोध, बोध ज्याने त्याने कसा घ्यायचा तो घ्यावा… सर्व जण एकमेकांकडे पाहत असतांनाच… राजकारणातले थोरले घर… समोर आले… जयदत्त अण्णा उठले… अन् म्हणू लागले…

jaydatt


नसते आमदारकी जेंव्हा…
जिव तुटका-तुटका होतो…
उपस्थितांनी अण्णाला रोखले… अण्णा हे गेल्यावर्षीचंच गाणं आहे… नव गाण म्हणा… अण्णांनीही क्षणाचा विलंब केला नाही… आणि ते म्हणू लागले…
जिस गली में तेरा घर ना होे….
उस गली से हमे गुजरणा नही…
जो डगर तेरे द्वार जाती हो…
उस डगर पर हमे पाँव रखणा नही…
म्हणत आपली आप बिती कटी पतंग म्हणून बोलून दाखवली… ते गाणं म्हणतांना अण्णांच्या नजरा कोणाकोणाकडे होत्या… हे समजणे वाले को इशारा काफी हैं… या दर्दभरे नगम्याने… शामियान्यातलं वातावरण… धीर गंभीर करून टाकलं होतं… त्यात उत्साह भरावा म्हणू… धसकट धोेंड्यातल्या प्रदेशातले आजबे उठले…


उरात होतय धड-धड लाली गालावर आली…
धसकट-धोंड्यांच्या आष्टीत बघा मी बाजी मारली…
मग बधीर झालोय… अधीर झालोया…
अन् तुझ्याच मुळं मी आमदार झालोया…
हे गाणं म्हणत… शामियानातलं वातावण सैराट करून सोडलं… तसे लक्ष्मण अण्णा उठले…अन्
मैं वाळू-वाळू चिल्लाउंगा कुर्ता फाडके…
मैं पंडितमुक्त -पंडितमुक्त चिल्लाउंगा कुर्ता फाडके…
मैं फिर आमदार बजाऊँगा कुर्ता फाडके…
तेवढ्यात धस आरेडले… किती कुर्ते फाडताय स्वत:चे… कधी विरोधकांचेही फाडा… धसांच्या प्रतिक्रियेवर अण्णा हसले अन् मटकन खाली बसले… आता शांतपणे प्रितमताई उठल्या… त्या काय ऐकावतात… याकडे सर्वांच्या नजरा लागल्या… अन् त्यांनी सुर पकडला…

pritan munde


एक हसरतथी की ऑचल का मुझे प्याय मिले…
मैं मंजील को तलाशा मुझे खासदारकी मिलें…
जिंदगी और बता तेरा इरादा क्या हैं…
तेरे दामन में बता खासदारकी से ज्या क्या हैं…
हा दर्द भरा तितकाच कोड्यात टाकणारा नगमा पेश करून… त्या खाली बसल्या… तशा नमिताताई उठल्या… अन् म्हणू लागल्या…

namita tai


हम्मा-हम्मा ये ग…
बाळाला दुध दे गं…
चारा पाटी भर हम्माला…
दुध वाटीभर बाळाला…
मम्माच्या गळ्यात आमदारकीच्या माळा…
बाळाच्या पायात चांदीच्या वाळा…
वाळा वाजतो छुमछुम…
बाळाचा बाप धावतो धुमधुम…
वात्सल्य आणि ममतेच्या गर्देतलं सुंदर अस अंगाई गीत ऐकायला भेटल्याचे समाधान उपस्थितांमध्ये दिसून आलं होतं… वातावरण हलकं-फुलकं आणि प्रसन्न झालं होतं… लेकीबाळीच्या अंगाई गीता नंतर बडे बुजुर्ग प्रकाश दादा उठले…
दिल के अरमा आँसू ओ में बहे गये…
हम वफा करकें भी तन्हा रहे गये…
मंत्री पद एक प्यास बनकर रह गयी…
मंत्री पद का किस्सा अधुरा रह गया…
हे गीत गावुन दादांनी लाल दिव्याची चाहत पुन्हा बुलंद केली… या उपर अमरसिंह उठले… तशी सिंहगर्जना झाली…
मर्दाची अवलाद आम्ही सशक्त…
शिवछत्राचे छावे आम्ही नाही अशक्त…
मर्द पंडित आम्ही.. गेवराईकरांचे भक्त…
वाघाचं काळीज फौलादी छाती…
पंडितमुक्त म्हणणार्‍यांची गिणती किती..?
यात त्वेषपुर्ण गितानंतर अचानक ढोल वाजू लागले… अंदाज आला… सुरेश धस उठले… अन

suresh dhas


ढोलकीच्या तालावर… रांगडेपणाच्या जोरावर…
चांगल्या चांगल्यांना नाचवतो…
हा मिनमिषीवाला बोका जसा…
हा चष्म्यावाला कावळा तसा…
दगड-धोंड्यांना आपटीतो…
आडवा आलाच स्वकीय तर…
त्याच्याशीही भिडतो…
स्वभावानुसार धसअण्णांनी आपला रांगडेपणा इतही कायम ठेवला… मग मेटे उठले…

vinayk mete


अबबऽऽ अबबऽऽऽ विंचू चावला…
देवा रे, देवा विंचू चावला…
काय मी करू विचूं चावला…
कोणाला सांगू विंचू चावला…
जिल्ह्यात सख्खे नाही कोणाचे…
माझे राजकारण मराठा समाजाचे…
ऐकतो मी केवळ देवइंद्राचे…
हे भारूड सादर करून विनायकबाबू खाली बसले… तसे संदिप क्षीरसागर उठले… अन् म्हणू लागले…
छोटा बच्चा जान के…
ना कोई आँख दिखा ना रे…
अकल कच्चा समजके…
हमको ना समजाना रे…
भोली सुरत जान के हमसें ना टकरानारे…
ना धीन धीनना नाच नचा देंगेे….
संदिप क्षीरसागरांचा हा इशारा… नव्हे तर हाबुकच होता… तो दुसर्‍या-तिसर्‍या विरोधात नाही तर.. दस्तुरखुद्द काकांना आवाहन देणारा… आता आभाराचं गाणं बाकी होतं… धनंजय मुंडे उठले…

cartoon 1


अन् म्हणू लागले…
दिल के झरो कें में तुझको बिठाकर…
यादोंकी मैं तुम कों बनाकर…
रखुंगा मैं दिल के पास…
मत हो मेरी जान उदास…
हे गाण गात धनंजय मुंडेंनी द्विअर्थी शब्द खेळ खेळला. मंत्री पदाच्या खुर्चीबरोबर अन्य कोणासाठी हे गीत गायलं का? यावरही चर्चा रंगल्या. मात्र या गीतानं… वातावरण उत्साही… धीर गंभीर… कभी खुशी कभी गम… हसू आणि असू सारखं झालं… सुर्य मावळतीकडे निघाला होता… पोटात आग पडली होती… पारटीसाठी तयार केलेल्या… पक्वानाचा वास नाकासमोर घुमत होता… सगळ्यांना आता जेवण करायचं होतं… जो तो चपटी, बोटी, हातभट्टी, देशी, विदेशी, विलायती, थंडाई, घोटा, मठ्ठा अन् हुक्क्यावर ताव मारून मदहोश बेहोश झाला…

Most Popular

error: Content is protected !!