Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हाधिकारी यांनी कोव्हिड वार्डची केली पाहणी ऑक्सिजन प्लांटचे केले उद्घाटन

जिल्हाधिकारी यांनी कोव्हिड वार्डची केली पाहणी ऑक्सिजन प्लांटचे केले उद्घाटन


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोव्हिड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा आरोग्य प्रशासनावर मोठा ताण पडू लागला. रूग्णालय रूग्णाने पुर्णत: भरले. काल जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्हा रूग्णालयात जावून कोव्हिड वार्डाची पाहणी केली. काही रूग्णांची त्यांनी चर्चाही केली. ऑक्सिजन प्लांटचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गिते यांच्यासह इतर कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.
गेल्या पंधरा दिवसापासून जिल्ह्यात कोव्हिड रूग्णांच्या संख्येत वाढ झाली. रूग्णांची वाढती संख्या पाहता सर्व कोव्हिड रूग्णालय भरले. काल जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कोव्हिड रूग्णांची व तेथील सुविधेची पाहणी करत आरोग्य प्रशासनाला सूचना केल्या. रूग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक सुर्यकांत गिते, डॉ.राठोड, डॉ.ढाकणे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!