Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमबीडच्या व्यापार्‍याची मुंबईच्या फुडस् एजन्सीकडून फसवणूक

बीडच्या व्यापार्‍याची मुंबईच्या फुडस् एजन्सीकडून फसवणूक


बीड (रिपोर्टर):- बीड येथील व्यापार्‍याकडून 8 टन मोसंबी व टरबूज मुंबई येथील मथुरा फुडस् अ‍ॅण्ड व्हेजिटेबल्स एजन्सीने मागितले होते. मात्र तेथे गेल्यानंतर त्यांचे मोसंबी आणि टरबूज खरेदी न करता परत पाठविले. परत येण्याचा वाहतूक खर्चही दिला नाही. त्यामुळे व्यापार्‍याचे 1 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी तलवाडा पोलीसात मुंबईच्या एजन्सीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गादास निवृत्ती अनभुले (रा. गेवराई) या व्यापार्‍याने मोसंबी आणि टरबूज मुंबई येथील मथुरा फुडस् अ‍ॅण्ड व्हेजिटेबल्स या एजन्सीला पाठवले होते. मात्र त्या एजन्सीने त्यांचे मोसंबी आणि टरबूज न घेता ते परत पाठवले तसेच परत जाण्याचा भाडाही दिला नाही. यामुळे सदरील व्यापार्‍याचे 1 लाख 60 हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी व्यापार्‍याच्या फिर्यादीवरून मथुरा फुडस् अ‍ॅण्ड व्हेजिटेबल्स एजन्सीविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात कलम 420, 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!