Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड सदोष पेवर ब्लॉकने दुचाकी स्लीप होऊ लागल्या

सदोष पेवर ब्लॉकने दुचाकी स्लीप होऊ लागल्या


बीड (रिपोर्टर):- कधी नव्हे तर बीड शहरात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्याची कामे करण्यात आली अहेत. मात्र या रस्त्याच्या मधोमध आणि दोन्ही बाजुने पेवर ब्लॉक टाकलेले आहेत. मात्र हे पेवर ब्लॉक बसवताना कुठे वर तर कुठे खाली बसवले आहेत. त्यामुळे या पेवर ब्लॉकवरून दुचाकी स्वलीप होऊन मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. आज सकाळी कॅनॉल रोड, बायपासवरून एक दुचाकी स्लीप होऊन एकाला गंभीर दुखापत झाली तर दुचाकीवरील आईसह चिमुकला सुदैवाने बचावला.
बीड नगरपालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपये किमतीच्या रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र सुभाष रोड वगळता एकही रोड पुर्ण झालेला नाही. प्रत्येक रस्ता अर्धवट सोडून दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच जे रस्ते पुर्ण झाले आहेत त्या रस्त्यांवर टाकण्यात आलेले पेवर ब्लॉक खाली-वर बसवलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावरून दुचाकी दररोज स्लीप होत आहेत. आज सकाळी कॅनॉल रोड, बायपास रोडवरून बीड शहरात येणारी एक दुचाकी याच पेवर ब्लॉकमध्ये स्लीप होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे तर त्याच्या सोबत असलेला चिमुकला बालंबाल बचावला.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...