Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये चोरी चिल्लरसह इतर साहित्य पळवले

कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये चोरी चिल्लरसह इतर साहित्य पळवले


बीड (रिपोर्टर):- जिल्हा न्यायालयाच्या परिसरात असलेल्या कॅन्टीनमध्ये रात्री चोरी झाली. चोरट्याने पाठीमागील पत्रा उचकून आतमध्ये प्रवेश केला. आतील चिल्लर पैशांसह फ्रीजमधील तुप, दही यासह अन्य साहित्याचा 22 हजाराचा ऐवज चोरून नेला.
काल धुलीवंदनाची सुट्टी असल्याने अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा उचलत कोर्टातील कॅन्टीनमध्ये चोरी केली. चोरट्याने पाठीमागील पत्रा उचकून आत प्रवेश केला. आतील पितळी भांडे, तीन मिक्स, फ्रीजमधील तुप, दही व गल्ल्यातील चिल्ल्रर पैसे असा एकूण 22 हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बीड शहरामध्ये गेल्या
काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून खासबाग येथील इमरान बागवान यांच्या अ‍ॅपे रिक्षाची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सदरील या बॅटरीची किंमत 5 हजार होती.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...