Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनामंत्रिमंडळातून लॉकडाऊनला विरोध, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागेल-टोपे

मंत्रिमंडळातून लॉकडाऊनला विरोध, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागेल-टोपे


मुंबई (रिपोर्टर):- देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले असले तरी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मात्र यामध्ये मतभेद आहेत. मंत्रीमंडळातील नेत्यांकडून लॉकडाऊनला विरोध केला जात आहे. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पुन्हा लॉकडाऊन नको, आम्ही विरोध करू असं म्हटलं आहे. दरम्यान, आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. मंत्रीमंडळातही काही लोकांचा लॉकडाऊनला विरोध आहे. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. जरीविरोध होत असला तरी परिस्थिती पाहुन निर्णय घ्यावा लागतो. तो असा अचानक घेतला जाणार नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच निर्णय होईल.लोकांनी नियम पाळला नाही तर कठोर निर्णय घ्यायला लागेल असंही त्यांनी म्हटलं.
लसीकरण मोहिम सुरु झाली असली तरी अद्याप काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राजेश टोपे यांनी नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. सध्या लॉकडाऊन कुणालाच नको आहे. सरकारने काढलेल्या निर्बंधाच्या सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होतेय. लॉकडाऊन टाळायचं असेल तर निर्बंधाचे पालन व्हायला हवे. कोणतेही निर्णय हे परिस्थिती पाहुन घेतले जातात असं राजेश टोपेंनी म्हटलं.

Most Popular

error: Content is protected !!