Monday, April 19, 2021
No menu items!
Home कोरोना बँकेतील अधिकारी,कर्मचार्‍यासाठी आरटीपीसीआर चाचणी गरजेची

बँकेतील अधिकारी,कर्मचार्‍यासाठी आरटीपीसीआर चाचणी गरजेची


बीड (रिपोर्टर):- 31 मार्च हे बँक आणि खासगी वित्तीय संस्थेचे आर्थिक वर्ष असते. या दोन दिवसामध्ये बँकांना आणि वित्तीय संस्थांना आपला वार्षिक ताळेबंद पुर्ण करावयाचा असतो. त्यामुळे बँका सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती असते. त्यामुळे बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपली अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी करूनच कामकाज करावे असे आदेश आज जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत.
या बँका आणि वित्तीय संस्था कर विभागाकडील आपले कर्ज वसुल करतात. जे खाते एनपीएमध्ये जात आहे असे खातेदाराकडे बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी वसुलीसाठी जात असतात. मार्चंडच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या कामकाजाचा वेग जास्त असतो. त्या सोबतच बँकांना आणि वित्तीय संस्थांना आपल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद 31 मार्चला जुळवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी बँकेत जास्तीचा वेळ देवून काम करतात. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बँकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपली अँटीजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी. ही चाचणी केल्याशिवाय बँकेचे कामकाज करू नये असे आदेश आज जिल्ह्यातील सर्व बँकेच्या शाखांना जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...