Sunday, April 18, 2021
No menu items!
Home संपादकीय प्रखर- आत्मविश्वास आणि ध्येय!!

प्रखर- आत्मविश्वास आणि ध्येय!!


आज आत्मविश्वास गमावलेली आणि मनाने खचलेली माणसं मोठया प्रमाणात दिसतात. जो माणुस खचतो तो कधी यशस्वी होवू शकत नाही. कुठलं ही टेन्शन आलं किंवा कामाचा ताण, कर्जबाजारीपणा, छळ यातून माणसं आत्महत्या करतात, पण आत्महत्या करणं हे धैर्य नसून तो एक षंडपणा आहे. जग प्रगतीचं दररोज नवनवीन शिखर गाठत आहे. माणसं तंत्रज्ञानाच्या युगात वावरतात, भैतिक सुख माणसांच्या पायाशी लोळण घालत असलं तरी माणुस सुखी नाही हे ही तितकंच खरं आहे. माणसाला संकटाचा सामना करावा लागतो असतो. संकट हे माणसांच्या भोवती घोंगावत असतात. संकट दुर करता आली पाहिजे. इतिहासात डाकावून पाहिलं तर अनेकांनी मोठ-मोठे पराक्रम केलेले आहेत. मोठया माणसांना अनेक वेळा अपयशाला तोंड द्यावं लागलंं, मात्र त्यांनी कधी हार मानली नाही. अपयशाला आणि संकटाला न घाबरता इतिहास घडवणारी माणसं नेहमीच अजरामर झालेली आहेत. इतिहासातून आपण काही तरी बोध घेतला पाहिजे. महात्मा गांधी यांच्या जवळ कोणतचं ही हत्यार नव्हतं. त्यांच्याकडे होता तो एक आत्मविश्वास, याच बळावर त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. अहिंसेचा मार्ग पत्कारुन बलाढय इंग्रजांना सळो की, पळो करुन लावणारे गांधीच होते.

prakhar logo


वेडी माणसचं……
जी माणसं आभाळाशी हस्तांदोलन करताना जमिनीवरील मातीला, मातीतील माणसांना विसरत नाही. ती माणसं समाजाच्या, राष्ट्राच्या उत्कर्षासाठी धडपडत राहतात. ती माणसं ध्येयवेडी असतात. अशी ध्येयवेडी माणसं आपल्यातूनच निर्माण झाली पाहिजे. अशी ध्येयवेडी माणसचं इतिहास घडवितात. उच्च ध्येय बाळगणार्‍यांना लोक वेडी म्हणतात पण ही ध्येयवेडी माणसंच इतिहास घडवितात. पृथ्वी ही गोल आहे, सांगणार्‍या गॅलिलिओला वेडे ठरविले, पण तो ध्येयवेडा होता. नवीन देश शोधायला चाललेल्या कोलंबस दर्यावर्दीला सुरुवातीला वेडं ठरविलं, पण कोलंबस ध्येयवेडा होता. आकाशात उडण्याचे स्वप्न बाळगणार्‍या राईट बंधूनाही वेडे ठरविले. तुमच्या ध्येयाला लोक हसले तर खचु नका, दबलेल्या स्प्रिप्रमाणे उसळी घ्या, फुटबॉल प्रमाणे झेप घ्या, एक दिवस एक यशस्वी माणुस म्हणुन जग तुमचा सन्मान करेल.


अब्राहम लिंकन
यश सहज मिळत नाही. या माणसाला 21 व्या वर्षी व्यवसायात खोट आली, 22 व्या वर्षी तो विधिमंडळाची निवडणुक हरला. 24 व्या वर्षी परत एकदा व्यवसायात खोट आल. 26 व्या वर्षी ऐन तारुण्यात पत्नीच्या मृत्यूचे दु:ख त्याला पचवावे लागले. 27 व्या वर्षी नौराश्याने तो पार खचुन गेला. वयाच्या 34 व्या वर्षी तो संसदीय विविधमंडळाची निवडणुक हरला. 45 व्या वर्षी तो सिनेटच्या निवडणुकीत पराभूत झाला. 47 व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष होण्याचे त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. 49 व्या वर्षी आणखी एकदा सिनेटवर निवडून येण्यात तो अयपशी ठरला आणि 52 व्या वर्षी तो अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी निवडून आला. हा माणुस म्हणजेच अब्राहम लिंकन, ही व्यक्ती अपयश आले म्हणुन थांबली असती तर? पण लिंकनच्या दृष्टीने अपयश ही तात्पुर्ती माघार होती. तो अंतिम टप्पा नव्हता. इतके पराभव पचवून लिकंन हे कधीच थांबले नाहीत. पराभवातून ते विजयाची वाट पाहू शकले. यश हे सहज मिळणारी गोष्ट नाही किंवा ती जादुची कांडी नाही. यशाला मिळवण्यासाठी परिश्रम तर करावेच लागतात, पण त्याला तितकं धैर्यवान असणं महत्वाचं आहे. सर्बियाचा जोर्ग डायकसन हा 18 महिन्याचा असतांना त्याच्या शरीरात इन्फेक्शन झालं. डॉक्टराने त्याचे दोन्ही हात,पाय कट करण्याचा सल्ला दिला. त्यानूसार त्याचे दोन्ही हातपाय कट करण्यात आले. तो पुर्णंत अपंग झाला होता. त्याच्या आई-वडीलाला त्याचा खर्च झेपत नसल्याने त्यांनी त्याला एका कुशल दाम्पत्याला दत्तक दिले. त्या दाम्पत्याने त्याचा सांभाळ केला. जोर्ग फुटबॉलशी खेळू लागला. त्याला फुटबॉलची चांगलीच गोडी लागली. पाहता-पहता तो सर्बियाच्या टीममध्ये सहभागी झाला. त्याला कृत्रीम पाय बसवण्यात आले. कृत्रीम पायाने तो टीममध्ये खेळू लागला. तो इतका चांगला खेळू लागला की, आपल्याला पायच नाही हे तो विसरुन गेला. त्याची जिद्दी मोठी होती. तो सर्बियाचा स्टार खेळाडू म्हणुन पुढे आला. केवळ जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर अपंग जोर्ग फुटबॉल पट्टू होवू शकतो. तर आपण धडधाकड माणसं का बरं कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात यशस्वी का होवू शकत नाही?


कठोर परिश्रम

जाता-जाता सहज यश मिळत नसतं. त्यासाठी अंगी धडाडी लागते. चांगले गुण लगतात आणि खुप तयारीही करावी लागते. सर्वानाचा यशस्वी व्हावंस वाटतं, पण त्यासाठी लागणारे कष्ट, वेळ देण्याची तयारी किती जणांची असते? कठोर परिश्रमाला पर्याय नाही. हेन्री फोर्ड म्हणतो जितके तुम्ही जास्त कष्ट कराल, तितकं तुम्ही जास्त नशीबवान व्हाल. सामान्य माणुस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चर्तु:शच काम करतो. जी माणसं काम करतात ती माणसं आपल्या क्षमतेच्या निम्याहून अधिक क्षमतेने काम करतात, त्यांना जग सलाम करतं आणि जी मोजकीच माणसं आपल्या पुर्ण क्षमतेनं म्हणजे 100 टक्के काम करतात. त्यांना जग डोक्यावर घेते. आत्मविश्वामुळे माणसाचे सामर्थ्य वाढते, सामर्थ्य वाढले की, यश मिळते, यश मिळाले की, ध्येय पुर्ण होते, ध्येयामुळे जीवनाचीही स्वप्नपुर्ती होते, त्यासाठी ध्येयवादी बनने गरजेचे आहे. ज्यांची स्वप्ने, ध्येय सुंदर असतात. ती माणसं मार्गदर्शक बनतात. ज्यांची स्वप्ने कुरुप असतात ती माणसे समाजात अडथळा निर्माण करतात. ज्यांची ध्येय महान असतात. उदात्त असतात ती माणसे ओबड-धोबड पाषणातून मुर्ती घडवतात, ज्यांची ध्येय अथांग असतात ती माणसं उंच आकाशात गवसणी घालतात. जीनवात चिकटी, धडपड, जिद्द असल्याशिवाय मनात आत्मविश्वास निर्माण होत नाही. पक्षांना पंख असतात म्हणुन ते अथांग अवकाशात झेप घेतात. आत्मविश्वासाचे पंख लावणारी माणसेच कर्तृत्वाच्या आकाशात झेप घेत असतात. विजेच्या दिव्याचा शोध लावत असतांना थॉमस एडीसन यांनी 999 वेळा प्रयत्न केला. प्रयोग करतांना दिवा लागायचा, मात्र लगेच विझायचा, पण एक हजाराव्या वेळेस दिवा न विझता अखंडपणे जळत राहिला. प्रकाशमान राहिला. हजार वेळा प्रयोग करुन मानवी जीवनात प्रकाश आणणार्‍या थॉमस एडिसन यांच्या आत्मविश्वासाला प्रणाम करावा लागेल.


नकारात्मक विचार
नकारात्मक विचारामुळे आज समाजात आत्महत्या वाढत आहे. कर्जबाजारी शेतकरी, संसाराला त्रासलेली सुन, अपेक्षाला घाबरणारा विद्यार्थी, व्यापारी इत्यादींच्या आत्महत्या वाढल्या. वाढत्या आत्महत्या चिंतेची बाब ठरू लागली. आत्महत्येने मार्ग सुटणार आहे का? उलट आत्महत्येने समस्या वाढत आहेत. घरातील कर्ता माणुस आत्महत्या करत असेल तर त्याच्या पाठीमागे त्याच्या कुटूबांचे किती हाल होतात? कुटूंब उघड्यावर पडतेे. एका व्यक्तीच्या आत्महत्येने अवघ्या कुटूंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जीवनात चिकाटी, धडपड, जिद्द असल्याशिवाय मनात आत्मविश्वास निर्माण होत नाही. आत्मविश्वामुळे माणसांच्या जीवनात जिद्द निर्माण होेते, जिद्दी माणसेच जीवन घडवितात. आत्मविश्वामुळे मनुष्याचे माणुसपण सोन्यासारखे झळाळते, आत्मविश्वामुळे यशाचे शिखर गाठता येते. आयुष्यात ज्या व्यक्ती उच्च पदावर गेल्या. त्यांच्या दोन शक्ती आहे. एक आत्मविश्वास आणि दुसरी शक्ती म्हणजे ध्येय! आयुष्यात कोणाला हरवायचे असेल तर आपल्या रागाला हरवा, आणि कोणाला जिंकायचे असेल तर आत्मविश्वासाला जिंका!!!

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...