Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड रामगड पोरका झाला, ह.भ.प.लक्ष्मण महाराज यांचे वैकुंठगमन आज दुपारी तीन वाजता रामगड...

रामगड पोरका झाला, ह.भ.प.लक्ष्मण महाराज यांचे वैकुंठगमन आज दुपारी तीन वाजता रामगड येथे होणार अंत्यसंस्कार


बीड । रिपोर्टर
बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र रामगड येथील मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांचे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 77 वर्षे होते. लक्ष्मण महाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायाचे मोठे नुकसान झाले.
लक्ष्मण महाराज गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रामगड परिसरामध्ये शोककळा पसरली. ह.भ.प. लक्ष्मण महाराज रामगडकर हे गेल्या अनेक वर्षांपासून श्रीक्षेत्र रामगड या ठिकाणी मठाधिपती आहेत. त्यांनी गडाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. रामगड हा थोरला गड म्हणून ओळखला जातो. या गडास श्रीराम प्रभूचे पाय लागले होते. त्यामुळे रामनवमीला गडावर दरवर्षी यात्रा भरत असे. लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या माध्यमातून दरवर्षी नारळी सप्ताह होत होता. त्याचबरोबर रामगड परिसरात ज्या गावात अखंड हरिनाम सप्ताह होत ते सर्व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होत असे. आज दुपारी 3 वाजता ह.भ.प. लक्ष्मण महाराज यांच्या पार्थीवावर रामगड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ह.भ.प.लक्ष्मण महाराज रिपोर्टरचे चाहते होते
ह.भ.प.लक्ष्मण महाराज हे नियमित सायं.दैनिक बीड रिपोर्टर वाचन करत असत. एखाद्या दिवशी त्यांना पेपर मिळाला नाही तर ते स्वत: बसस्थानकात येऊन पेपर घेऊन जात असे. 2017 साली रिपोर्टरच्या वर्धापन दिनी त्यांनी कार्यालयाला भेट देत रिपोर्टरला शुभेच्छा दिल्या होत्या.
वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान-ना.मुंडे
बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथील मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने रामगड पोरका झाला असून, वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शोकभावना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण व थोरला गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र रामगडाचे महंत लक्ष्मण महाराज यांचे आज (दि. 30) खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान देहावसान झाले. आज संत तुकाराम महाराजांची बीज, आजच्या दिवशी लक्ष्मण महाराजांचे देहावसान होणे हा योगायोग स्मरणात राहील. महाराजांच्या जाण्याचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी ह.भ.प. लक्ष्मण महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जिल्हा अध्यात्मिकदृष्ट्या
पोरका-आ.क्षीरसागर
प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामगडाचे मठाधिपती ह.भ.प.लक्ष्मण महाराज यांच्या निधनाची बातमी समजली. महाराज हे अध्यात्मिक क्षेत्रातले अधिष्ठान होते. रामगडाच्या विकासासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. आज बीड जिल्हा त्यांच्या जाण्याने अध्यात्मिकदृष्ट्या पोरका झाला असा दु:खद संदेश बीड विधानसभा मतदार संघाचे आ.संदिप क्षीरसागर यांनी देत दु:ख व्यक्त केले.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....